Press "Enter" to skip to content

स्वर्गीय जनार्दन भगत साहेब यांच्या 38 व्या पुण्यतिथीनिमित्त आयोजित कार्यक्रमाची नियोजन बैठक

थोर समाजसुधारक स्वर्गीय जनार्दन भगत साहेब यांच्या 38 व्या पुण्यतिथीनिमित्त गुरुवार दिनांक 07 मे रोजी सायंकाळी 06 वाजता श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ आणि जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने उलवे नोडमधील रामशेठ ठाकूर मैदानावर आयोजित करण्यात आलेल्या सामाजिक कार्यक्रमासंदर्भातील अंतिम नियोजन आढावा बैठक आज (बुधवारी) माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली.

या बैठकीस प्रमुख मान्यवर म्हणून ज्येष्ठ नेते जे. एम. म्हात्रे, संस्थेचे अध्यक्ष अरुणशेठ भगत, महापौर नितीन पाटील, भाजपचे जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी, दिबांचे चिरंजीव अतुल पाटील, मंडळाचे सचिव नगरसेवक परेश ठाकूर, संस्थेचे सचिव एस.टी. गडदे, संचालक अनिल भगत, संजय भगत, भाऊशेठ पाटील, वसंत पाटील, ज्येष्ठ नेते जयंत पगडे, पंचायत समितीचे उपसभापती भूपेंद्र पाटील, मंडल अध्यक्ष दशरथ म्हात्रे, विकास घरत, माजी पंचायत समिती सदस्य रत्नप्रभा घरत, जिल्हा परिषद सदस्या निकिता खारकर, पंचायत समिती सदस्य जिज्ञासा कोळी, वितेश म्हात्रे, जिल्हा उपाध्यक्ष गणेश कडू, मयुरेश नेतकर, यांच्यासह पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

More from UncategorizedMore posts in Uncategorized »

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.