सिटी बेल । उरण । घन:श्याम कडू ।
उरण नगरपालिका कर्मचारी, रायगड जिल्हा चर्मकार संघटनेचे उपाध्यक्ष व संत रोहिदास समाज उत्कर्ष मंडळ दत्तवाडी कुर्डुसचे उपाध्यक्ष सचिन शांताराम नांदगावकर यांच्या मातोश्री श्रीमती सुशीला शांताराम नांदगावकर यांचे वयाच्या ६५ व्या वर्षी दुःखद निधन झाले आहे.
श्रीमती सुशिला नांदगावकर या को.ए.सो.शाळा समिती कुर्डूस च्या सदस्यां व अंगणवाडी च्या सेवानिवृत्त शिक्षीका होत्या. त्यांच्यावर कुर्डुस येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी मोठा जनसमुदाय उपस्थित होता.
त्यांच्या पश्चात दोन मुले, दोन मुली, दिर, सुना, नातवंडे असा परिवार आहे. त्यांचे दशक्रिया विधी रविवार दि. ३० मे रोजी तर उत्तरकार्य गुरुवार दि.३ जून रोजी राहत्या घरी कुर्डुस येथे करण्यात येणार असल्याची माहिती नांदगावकर कुटूंबियांनी दिली.








Be First to Comment