Press "Enter" to skip to content

अक्षर मानव आता ग्रेट ब्रिटन आणि इटलीत, रोहिदास कवळे समन्वयक

सिटी बेल । रसायनी । राकेश खराडे ।

समाज शांत, सुखी व समृद्धीसाठी गेले २५ वर्षे झटणा-या अक्षर मानव आता भारतात विस्तार करत असतानाच ग्रेट ब्रिटन आणि इटलीमध्ये शाखा उघडली गेली. मिलिंद चौबळ (ब्रिटन अध्यक्ष) आणि सुमित खाडिलकर (इटली अध्यक्ष) यांची नियुक्ती झाली आहे.
माणूस, कुटुंब, समाज आणि निसर्ग यांच्या मदतीसाठी काम करणारी ही संघटना धर्म, जातपात, वर्ण, भाषा, प्रदेश , लिंग, रूढी परंपरा ह्या सर्व भेदांच्या पलिकडे जाऊन फक्त मानवता आणि माणूसकी ह्या एकमेव विचाराने कार्यरत आहे.

नव्या कार्यकारणीत श्रीकांत डांगे ( आंतरराष्ट्रीय अध्यक्ष), राजनंदिनी ( भारत अध्यक्ष) , प्रणोती पाटील (महाराष्ट्र अध्यक्ष) यांची नेमणूक होत असताना रायगडचे साहित्यिक रसायनी तील भटवाडी येथील रोहिदास कवळे समन्वयक ( ज्ञान, ग्रंथालय, साहित्य, कविता) तसेच त्यांची पत्नी प्राजक्ता कवळे समन्वयक ( कुटुंब, महिला, संगीत, कचरा व्यवस्थापन) या नेमणूक करत असताना रोहिदास कवळे यांच्याकडे ग्रंथालय विभागप्रमुख आणि प्राजक्ता कवळे यांच्याकडे कचरा व्यवस्थापन विभागप्रमुख ही जबाबदारी सोपवण्यात आली आहे.तर पनवेलचे कवी गुणवंत सीताराम पाटील यांची नेमणूक साहित्य विभागप्रमुख अशी करण्यात आली आहे.

माणसाने सन्मानपूर्वक जगण्याकरता झटणा-या या संघटनेत सभासदत्वासाठी कौमुदी व-हाडकर (९०२११९१५५१) यांच्याशी संपर्क साधावा, असे सांगत असताना समन्वयक रोहिदास कवळे म्हणाले की अक्षर मानव ही संघटना आणि सुप्रसिद्ध साहित्यिक राजन खान व त्यांचे सहकारी यांच्या प्रेरणेने १९९६ साली झाली.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.