सिटी बेल । खांब-रोहे । नंदकुमार मरवडे ।
रोहे तालुक्यातील गावठाण येथील रहिवासी लक्ष्मीबाई गजानन कांदळेकर यांचे अल्पशा आजाराने राहत्या घरी दु:खद निधन झाले. त्या समयी त्या ९० वर्षांच्या होत्या.
अतिशय प्रेमळ,सर्वांशी मिळून मिसळून राहणा-या व आपल्या शेती व्यवसायावर नितांत प्रेम करणाऱ्या लक्ष्मीबाई कांदळेकर या सा-या आप्तस्वकीयांमध्ये व गावामध्ये एक सुस्वभावी व्यक्तिमत्त्व म्हणून त्यांची विशेष ओळख होती.तर कोरोना महामारीचे पार्श्वभूमीवर कोरोना नियमावलीचे पालन करीत त्यांचे अंत्यविधी पार पाडण्यात आले.त्यांच्या पश्चात दोन मुलगे,दोन मुली,सुना,जावई, नातवंडे असा परिवार असून त्यांचे दशक्रियाविधी बुध.दि.२६ मे तर अंतिम धार्मिकविधी शुक्र. दि.२८ मे रोजी राहत्या घरी होणार असल्याची माहिती त्यांच्या निकटवर्तीयांकडून देण्यात आली आहे.








Be First to Comment