सिटी बेल । खांब-रोहे । नंदकुमार मरवडे ।
रोहे तालुक्यातील देवकान्हे गावच्या रहिवासी सुलोचना वामण भोईर यांचे देवकान्हे निवासस्थानी वयाच्या ७५ व्या वर्षी अल्पशा आजाराने दु:खद निधन झाले.
त्यांच्या निधनाबद्दल भोईर परिवार व त्यांच्या आप्तस्वकीयांकडून दु:ख व्यक्त केले जाऊ लागले आहे.त्या प्रेमळ व नम्र स्वभावाच्या होत्या.वाढत चाललेल्या कोरोना महामारीचे पार्श्वभूमीवर कोरोना नियमावलीचे पालन करीत त्यांचे अंत्यविधी पार पाडण्यात आले.त्यांच्या पश्चात त्यांना दोन मुले,सुना,नातवंडे असा परिवार असून त्यांचे दशक्रियाविधी शुक्रवार दि.२८ मे तर अंतिम धार्मिकविधी रविवार दि.३० मे रोजी राहत्या घरी होणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.








Be First to Comment