सिटी बेल । गोवे-कोलाड । विश्वास निकम ।
रोहा तालुक्यातील गोवे गावाचे रहिवाशी अनंता कृष्णा वाफिलकर यांचे रविवार दि.१६ मे २०२१ अल्पशा आजाराने आकस्मित निधन झाले.मृत्यूसमयी त्यांचे वय ४५ वर्षाचे होते. ते अतिशय कष्टाळु व परोपकारी स्वभावाने सर्वांना परिचित होते.
त्यांच्या मृत्यूची वार्ता समजताच त्यांच्या अंत्यविधी साठी कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे मोजकेच नागरिक उपस्थित होते.परंतु मोबाईलच्या माध्यमातून त्यांना असंख्य नागरिकांनी श्रद्धांजली वाहिली.त्यांना समाजिक कामाची नेहमी आवड होती. तरुण वयात त्यांचे निधन झाल्यामुळे त्यांच्या कुटुंबावर दुःखाचे डोंगर पसरलेले आहे.
त्यांच्या पश्चात त्यांची पत्नी, एक मुलगा,दोन भाऊ,एक बहीण,भावजया, चुलते,चुलत भाऊ,चुलत बहिणी,पुतणे व मोठा वाफिलकर परिवार आहे.त्यांचे दशक्रिया व उत्तर कार्यविधी दोन्ही एकाच दिवशी मंगळवार दि.२५ मे २०२१ रोजी होणार आहेत.








Be First to Comment