सिटी बेल । उरण ।
उरण तालुक्यातील गावठाण गावाचे शेतकरी कामगार पक्षाचे ज्येष्ठ नेते व चिरले ग्रामपंचायत माजी सदस्य शंकर चांगु टकले यांचे आकस्मिक निधन झाले.
शंकर टकले हे अत्यंत मनमिळावू स्वभावाचे आणि मितभाषी होते. ते नेहमी सर्वांच्या सुखा दुःखात सहभागी होत असत. गेले काही दिवस ते मृत्युशी झुंज देत होते. त्यांवर मुंबई येथील प्रख्यात रूग्णालयात उपचार सुरु असताना त्यांची मृत्युशी झुंज अखेर अयशस्वी ठरली.
त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, तीन मुली, जावई, नातवंडे असा मोठा परिवार आहे. शंकर टकले यांना लोकं प्रेमाने शंकरदादा असे म्हणत असत. त्यांच्या असे अकस्मात जाण्याने गावठण गावावर शोककळा पसरली आहे.








Be First to Comment