सिटी बेल । उरण । सुनिल ठाकुर ।
श्रीमती आशा लक्ष्मण चौधरी जन्म १ जून १९५५, जन्मगाव कोन, ता. भिवंडी. मृत्यू दिनांक ११ मे २०२१.
एकूण तीन भाऊ व चार बहिणी. बहिणींमध्ये सर्वात मोठी. एक भाऊ डॉ. मधुकर रामजी पाटील आगरी समाजातील भिवंडी तालुक्यातील पहिले एम.बी.बी.एस. डॉक्टर
कै.लक्ष्मण सिताराम चौधरी राहणार मुक्काम दापोडे, तालुका भिवंडी. यांचेशी लग्न 17 मे 1975.
शिक्षण :- लग्नाअगोदर माहेरी दहावीपर्यंत चे शिक्षण. लग्नानंतर सासरी एकत्रित कुटुंब पद्धतीत ( सासू- सासरे, पाच दिर, एक नणंद, तीन मुलं ) राहून, टिळक महाराष्ट्र विद्यापीठातून B. A. पदवी परीक्षेचा शिक्षण घेतलं.
महाराष्ट्रशासनाच्या एकात्मिक बाल विकास प्रकल्प अंतर्गत मौजे मानकोली तालुका भिवंडी येथे अंगणवाडी सेविका म्हणून वीस वर्ष सेवा केली.
अंगणवाडी सेविका युनियन चे भिवंडी तालुका अध्यक्ष म्हणून दहा वर्षाहून अधिक काळ काम पाहिले.
मु. दापोडे येथे महिलांना एकत्र करून महादेवी महिला मंडळ ची स्थापना करण्यास पुढाकार घेतला व जवळपास दहा वर्ष महादेवी महिला मंडळ दापोडे च्या अध्यक्ष म्हणून जबाबदारी पार पाडली, व त्यानंतर शेवटपर्यंत महादेवी महीला मंडळामध्ये सक्रिय सहभाग ठेवला.
आपत्य : दोन मुलं व एक मुलगी
मोठा मुलगा श्री. भारद्वाज लक्ष्मण चौधरी, अधिवक्ता सर्वोच्च न्यायालय भारत व अध्यक्ष आगरी-कोळी भूमिपुत्र महासंघ
दुसरा मुलगा श्री. जयू लक्ष्मण चौधरी शिक्षण बी.ए.
मुलगी सौ. अस्मिता अमर शेळके विवाहित शिक्षण बी. कॉम., एल.एल. बी.








Be First to Comment