सिटी बेल । खांब-रोहे । नंदकुमार मरवडे ।
रोहे तालुक्यातील वरसे येथील जेष्ठ सामाजिक कार्यकर्त्या वत्सला मारूती मोरे उर्फ मम्मी यांचे शुक्र. दि.१४ मे रोजी राहत्या घरी अल्पशा आजाराने दु:खद निधन झाले.त्या समयी त्या ७२ वर्षांच्या होत्या.
संपुर्ण वरसे गावामध्ये त्यांना सर्वजण प्रेमाने मम्मी म्हणून संबोधत असत.संपूर्ण गावाची मम्मी असणाऱ्या वत्सला मोरे या केवल वरसे येथेच नव्हे तर परिसरातील बहुतांश ठिकाणी सार्वजनिक कार्यक्रमात नेहमी वावरत असत.तसेच कोलाड-आंबेवाडी येथे जनसेविका म्हणून लोकांच्या सेवेत बरीच वर्षे व्यथित केल्यानंतर वरसे येथे त्यांनी अंगणवाडी सेविका म्हणून यशस्वीरीत्या आपली जबाबदारी सांभाळली.
अतिशय प्रेमळ,बोलण्या चालण्यात नम्रता तसेच अडल्यानडल्या प्रसंगाला हक्काने धाऊन जाणाऱ्या व सर्वांशी मिळून मिसळून वागणाऱ्या होत्या. त्यांच्या दु:खद निधनाबद्दल त्यांचे आप्तस्वकीय, मित्रपरिवार व.सगेसोयरे तसेच वरसे ग्रामस्थांकडून अतिव दु:ख व्यक्त केले जाऊ लागले आहे. तर कोरोना महामारीचे पार्श्वभूमीवर कोविड नियमावलीचे पालन करून त्यांचे अंत्यविधी पार पाडण्यात आले.त्यांच्या पश्चात दोन मुलं,दोन मुली,सुना, जावई व नातवंडे तसेच कर्णेकर ,पावशे म्हात्रे,पडवळ कांबळे ,बैकर,पाटील, बिलये असा खुप मोठा परिवार असून त्यांचे दशक्रियाविधी व अंतिम धार्मिकविधी मंगळवार दि.२५ मे रोजी वरसे येथील निवासस्थानी होणार असल्याची माहिती त्यांच्या निकटवर्तीयांकडून देण्यात आली आहे.








Be First to Comment