Press "Enter" to skip to content

शिवसेनेचे युवा नेते हेमंत देशमुख यांचे हृदयविकाराने निधन

असंख्य चाहत्यांकडून साश्रू नयनांनी निरोप

सिटी बेल । धाटाव । शशिकांत मोरे ।

रोहा तालूका शिवसेनेचे युवा नेते, शेणवई गावचे सामाजिक कार्यकर्ते हेमंत देशमुख यांचे वयाच्या ४८ व्या वर्षी हृदविकाराने निधन झाले.देशमुख यांच्या अचानक जाण्यामुळे सबंध रायगड जिल्ह्यात शोककळा पसरली असून शिवसेनेमधील भविष्यातील नेतृत्व गमावल्याची प्रतिक्रिया सर्वच राजकीय पक्षांकडून व्यक्त झाली.तर सामाजिक नेतृत्व हरपल्याची भावना अनेकांनी व्यक्त केली.असंख्य चाहत्यांकडून साश्रू नयनांनी त्यांना रात्री उशिरा भावपूर्ण निरोप देण्यात आला.

हेमंत यशवंत देशमुख हे एक बहुआयामी व्यक्तिमत्व म्हणून जिल्ह्यात सुपरिचित होते.आखिल भारतीय मराठा महासंघाचे कोकण विभागीय अध्यक्ष,सकल मराठा समाज राज्य समन्वयक असताना त्यांनी मराठा आरक्षणा विषयी लढा दिला.तर मध्यंतरी राष्ट्रीय काँग्रेसचे रोहा तालुका युवक अध्यक्ष म्हणून काम करताना युवकांना संघटित केले होते.सध्या अलिबागचे आमदार महेंद्र दळवी यांच्या नेतृत्वाखाली शिवेसनेचे युवा नेते म्हणून कार्यरत होते.नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत त्यांच्या मुलीला त्यांनी सरपंच म्हणून निवडून आणले.

सोमवारी दु २:३० वा. त्यांची हृदयविकाराच्या झटक्याने प्राणज्योत मालवली.त्यांच्या निधनाचे वृत्त कळताच आ.महेंद्र दळवी,समीर शेडगे,विजय मोरे,विनोद पाशिलकर,मनोज कुमार शिंदे,रोहिदास पाशिलकर,प्रदीप देशमुख,अनिल भगत,अनंत देशमुख,उत्तम नाईक,नवनीत डोलकर, विविध राजकीय पक्षांचे कार्यकर्ते, नातेवाईक सगे सोयरे यांसह त्यांच्यावर निस्सीम प्रेम करणारे आदिवासी बांधव यांनी त्यांचे अंतिम दर्शनासाठी धाव घेतली.त्यांच्या पार्थिव देहावर रात्री उशिरा अंत्यसंस्कार करण्यात आले व असंख्य चाहत्यांकडून साश्रू नयनांनी त्यांना अखेरचा भावपूर्ण निरोप देण्यात आला.

त्यांच्या पश्चात आई,वडील,पत्नी, मुलगा, मुलगी,भाऊबहिण,पुतणे असा मोठा परिवार आहे.त्यांचे दशक्रिया विधी बुधवार दि.२६ मे तर उत्तरकार्यविधी २९ मे रोजी शेणवई येथील निवासस्थानी करण्यात येणार आहेत.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.