सिटी बेल । रसायनी । राकेश खराडे ।
रसायनी पाताळगंगा परीसरातील जुने जानते ज्येष्ठ व सर्वपरिचित असलेले पौरोहित्य करणारे असे भटजी कै.किशोर कुलकर्णी काका यांचे कोरोनाने निधन झाले आहे. तेरा दिवसांअगोदर हाॅस्पिटलात उपचार घेत असताना त्यांच्या पत्नीचे निधन झाले.तर वयाच्या ७५ व्या वर्षी हाॅस्पिटलात कोरोनावर उपचार घेत असताना भटजी कै.किशोर कुलकर्णी यांची प्राणज्योत मालवली.
कै.कुलकर्णीं रसायनी पाताळगंगा वेदपुरुष पुरोहित संघाचे सल्लागार आहेत.ते ज्योतीषी कुंडलीही पाहायचे.त्यांचा पौराहित्य क्षेत्रात जवलपास ४० वर्षांचा अनुभव होता.त्यांच्या जाण्याने रसायनी पाताळगंगा परिसरातील वेदपुरुष पुरोहित संघाकडून शोक व्यक्त केला जात आहे.








Be First to Comment