सिटी बेल । नागोठणे । महेश पवार ।
नागोठण्याजवळील कोलेटी येथील रहिवासी विठाबाई मालू नागोठकर यांचे मंगळवार ४ मे रोजी दुपारी १२ वाजता त्यांच्या कोलेटी येथील राहत्या घरी वयाच्या ९० व्या वर्षी वृध्दापकाळाने निधन झाले. महाराष्ट् राज्य प्राथमिक शिक्षक समिती जिल्हा सरचिटणीस तथा नागोठण्याजवळील वणी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक अनिल नागोठकर यांच्या त्या मातोश्री होत.
कै. विठाबाई नागोठकर या स्वभावाने प्रेमळ व मनमिळाऊ होत्या. त्या स्पष्ट वक्त्या होत्या. कै. विठाबाई यांनी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत आपले दोन मुले सुनिल व अनिल यांचे पालनपोषण करून त्यांना समाजात मानाचे स्थान मिळवून दिले होते. कै. विठाबाई नागोठकर यांच्या प्रश्चात सुनिल व अनिल ही दोन मुले, दोन सुना , मुलगी, जावई, नातवंडे असा मोठा परिवार आहे. कै. विठाबाई नागोठकर यांचा दशक्रिया विधी गुरुवार दि. १३ मे व उत्तरकार्य रविवार दि. १६ मे रोजी त्यांच्या कोलेटी येथील राहत्या घरी होणार असल्याची माहिती त्यांची नात डॉ. पियुषा नागोठकर यांनी दिली.








Be First to Comment