सिटी बेल । गोवे-कोलाड । विश्वास निकम ।
रोहा तालुक्यातील गोवे गावाच्या रहिवाशी विमल राम वाफिळकर यांचे अल्पशा आजाराने निधन झाले.
त्या प्रेमळ व फार कष्टाळू स्वभावाने सर्वांना परिचित होत्या.त्याचे सासर व माहेर दोन्ही गोवे गावातील असल्यामुळे त्यांचे सर्वांशी सळोख्याचे संबंध होते.व सामाजिक कार्यात त्या नेहमी सक्रिय होत्या.
त्यांच्या मृत्युची वार्ता समजताच त्याच्या अंत्यदर्शनासाठी कोरोना विषाणूमुळे सोशल डिस्टन पालन करीत मोजकेच नागरिक उपस्थित होते.परंतु मोबाईलच्या माध्यमातून त्यांना असंख्य नागरिकांनी श्रद्धांजली वाहिली.त्या शेकडो लोकांना दाढ दुखीवर औषध देणारे राम वाफिलकर यांच्या पत्नी व गोवे गाव कमेटीचे अध्यक्ष विलास पवार यांची बहीण होती त्यांच्या पच्छात त्यांचे पती, दोन मुली,दिर,जावा,पुतणे,नातवंडे व मोठा वाफिळकर परिवार आहे.त्यांचे दशक्रिया विधी शुक्रवार दि.१४ मे २०२१ व उत्तर कार्य विधी रविवार दि.१६ मे २०२१ रोजी त्यांच्या राहत्या घरी होणार आहेत.








Be First to Comment