Press "Enter" to skip to content

माजी उपनगराध्यक्ष आरीफ पटेल यांना बंधूशोक

खलिल अहमद शफीक अहमद पटेल यांचे 5 मे रोजी निधन

सिटी बेल । पनवेल ।

पनवेल नगर परिषदेचे माजी उपनगराध्य आरिफ पटेल यांचे कनिष्ठ बंधू खलिल अहमद शफीक अहमद पटेल यांचे नैसर्गिक निधन झाले. मृत्युसमयी त्यांचे वय 61 वर्षे होते.

सध्या सुरू असलेल्या पवित्र रमजान महिन्यात शांतपणे मृत्यूचे आमंत्रण येणे म्हणजे जन्नत नशीब होणे असे इस्लाम धर्मात मानले जाते. इस्लाम धर्माच्या शिकवणी नुसार मक्का मदिना येथे मृत्यू येणे,अल्लाह च्या राह मध्ये मृत्यू येणे आणि रमजान महिन्यात मृत्यू नशिबी येणे यास सौभाग्य समजले जाते.खलील अहमद पटेल यांच्या पश्चात पत्नी,विवाहित मुलगा,विवाहित मुलगी,सून,जावई,नातवंडे,भाऊ,भावजय असा मोठा परिवार आहे.

खलिल भाई यांनी दोन दशकाहून अधिक कालखंड सौदी येथे नोकरी निमित्ताने वास्तव्य केले. सौदी मध्ये असताना व तेथून परतल्यानंतर खलील भाई यांनी नेहमीच सामाजिक कार्यासाठी सढळ हस्ते योगदान दिले. मायनॉरिटी गर्ल्स स्कूल च्या उभारणी करता निधी संकलनना मध्ये त्यांनी सिंहाचा वाटा उचलला होता. परंतु दान हे सत्पात्री व गुप्त असावे या सिद्धांतानुसार त्यांनी कधीही केलेल्या समाजकार्याचा अथवा सढळ हस्ते दिलेल्या मदतीचा गवगवा केला नाही. अर्थातच या सगळ्यामुळे ते प्रसिद्धीच्या झोतापासून दूर राहिले. 4 मे च्या रात्री त्यांनी ईशा आणि तरावी ची नमाज अदा केली, त्यानंतर वितर ची नमाज अदा करून ते निजावयास गेले.पहाटे लवकर उठून त्यांनी तहज्जुद ची नमाज अदा केली,त्यानंतर फझर ची नमाज अदा करून ते मॉर्निंग वॉक साठी गेले. तेथून परतल्यानंतर त्यांनी कुटुंबियांस सांगितले की आता मी कुरान पठणासाठी बसत आहे त्यानंतर मी विश्राम करणार आहे.

साधारण साडेनऊ ते पावणे दहाच्या दरम्यान त्यांना उठविण्याचा प्रयत्न केला असता त्यांची प्राणज्योत मालवली असल्याचे लक्षात आले. त्यांना नैसर्गिक मृत्यू आला. खलिल अहमद शफीक अहमद पटेल हे माजी उपनगराध्यक्ष आरिफ भाई पटेल यांचे कनिष्ठ बंधू होते. निधनाची वार्ता समजल्यानंतर आमदार बाळाराम पाटील, माजी नगराध्यक्ष जे एम म्हात्रे, पनवेल महानगरपालिका जिल्हा चिटणीस नगरसेवक गणेश कडू यांच्या सह असंख्य लोकांनी आरिफ पटेल यांचे सांत्वन केले.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.