सिटी बेल । गोवे-कोलाड । विश्वास निकम ।
रोहा तालुक्यातील मौजे चिल्हे येथील उच्च शिक्षित व प्रतिष्ठित जेष्ठ नागरिक उत्कृष्ट कबड्डीपटू गावातील पहिले सरकारी कर्मचारी म्हणून ओळखले जाणारे कृष्णा पांडुरंग खांडेकर (साहेब) यांचे वयाच्या ८४ व्या वर्षी अल्पशा आजाराने ५ मे रोजी दुःखद निधन झाल्याने खांडेकर कुटुंबियांवर दुःखाचे डोंगर तर चिल्हे गावासह विभागात शोककळा पसरली आहे.
सर्वांच्याच सुपरिचित असलेले खांडेकर हे कोलाड पाटबंधारे खात्यात उच्च पदावर कार्यरत होते जवळपास वीस ते पंचिविस वर्ष निर्भीटपणे सेवा केली तद्नंतर ते सेवानिवृत्त झाले सामाजिक शैक्षणिक कला क्रीडा क्षेत्रात त्यांच उल्लेखनीय कार्य होते तातकालीन कबड्डी खेळातील आधारस्तंभ जिल्हास्तरावर अनेक मैदाने गाजवले उत्कृष्ट खेळाडू मलखांबाच्या खेळात उत्कृष्टपणे बनाटीचा खेळ करणारे अत्यन्त शांत आणि मनमिळाऊ स्वभावाचे सर्वांच्या मदतीस धावून येणारे त्याचबरोबर विंचू काटा सर्पदंशाचे ते चांगले मांत्रिक मंत्रिकविद्येने ते मानवाच्या शरीरातील विष उतरवण्याचे महान कार्य ते करत असलेले खांडेकर यांचे निधन झाल्याने समाज्यात मोठी पोकळी निर्माण झाली आहे. कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भावामुळे सोशल डिस्टन्सचा पालन करत त्यांच्या अंत्यविधीसाठी मोजकेच नागरिक उपस्थित होते.तर अनेकांनी त्यांच्या दुःखात सहभाग म्हणून मोबाईलच्या माध्यमातून संपर्क साधत त्यांना श्रद्धांजली वाहिली त्यांच्या पश्चात त्यांची पत्नी, एक मुलगा, दोन मुली ,भाऊ,जावई ,नातवंडे ,पुतणे असा मोठा खांडेकर परिवार आहे ,
त्यांचे दशक्रिया विधी शुक्रवार १४ मे व उत्तरकार्य तेरावा सोमवारी १७ मे रोजी त्यांच्या राहत्या निवस्थानी मौजे चिल्हे येथे संपन्न होणार असल्याची माहिती त्यांच्या कुटूंबियाकडून प्राप्त झाली आहे.








Be First to Comment