सिटी बेल । धाटाव । शशिकांत मोरे ।
मागील वर्षा पासून थैमान घातलेल्या कोरोना संसर्गाचे आज रोहा तालुक्यातील धाटाव ग्राम पंचायतीचे लिपिक चंद्रकांत रटाटे हे गावात तीसरे बळी ठरले.त्यांच्या निधनाने सबंध पंचक्रोशीत शोक व्यक्त होत आहे.तर या धक्कादायक घटनेमुळे येथील वातावरण शोकाकुल झाले आहे.
धाटाव ग्रामपंचायत मधे गेली कित्येक वर्ष लिपिक म्हणून काम करणारे चंद्रकांत जानू रटाटे यांना अवघ्या दोन दिवसांपूर्वी त्रास जाणवू लागला.त्यांना तातडीने इस्पितळात दाखल करण्यात आले.आज सकाळी १०:३० वा. त्यांनी तिथेच अखेरचा श्वास घेतला.त्यांच्या अचानक जाण्याने ग्रामपंचायत विशेषतः धाटाव गावचे मोठे नुकसान झाले आहे.
कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे ग्रामपंचायत हद्दीत मागील वर्षी सुरेश चौहान या एकमेव व्यक्तीचे निधन झाले होते.मात्र यावर्षी कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत अवघ्या पाच दिवसांपूर्वी मलखंडवाडी येथील अनिल घाग यांच्या नंतर आज चंद्रकांत रटाटे हे बळी ठरले.ग्राम पंचायत हद्दीत एकूण कोरोनाचे तीन बळी झाल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.








Be First to Comment