महाड मधील सह्याद्री मित्र गिरिभ्रमण संस्था व सिस्केप संस्थेच्या गिर्यारोहकांचा चक्रीवादळ ग्रस्तांना मदतीचा हात
सिटी बेल लाइव्ह / प्रमाेद जाधव / माणगांव.
महाड मधील सह्याद्री मित्र गिरिभ्रमण संस्था व सिस्केप संस्थेच्या गिर्यारोहकांनी माणगाव तालुक्यातील निजामपूर जवळील बडदेमाच या सह्याद्री पर्वतातील दुर्गम गावात अन्नधान्याची मदत पोहचविली, त्यासाठी माणगाव हुन निजामपूर मार्गे जिते गावाकडे जाणाऱ्या रस्त्याने शिरवली व तिथून टिटवे या गावात पोहचुन तिथून प्रत्येकांनी आपआपल्या सॅक मध्ये अंदाजे 8 किलो रेशन व 1 लिटर तेल असे घेऊन साधारण पाऊण तास डोंगर चढून बडदे या गावात पोहचविण्यात आले. गावातील काही ग्रामस्थ अगोदरच खाली टिटवे गावात आलेले होते त्यांनी सुद्धा आपआपले किट घेतले . गावात साधारण 22 घरे असून “बडदे “आडनावाचे कुणबी मराठा लोक राहतात ,सह्याद्री पर्वताचे मनोहरी दर्शन या गावातून होते.निजामपूर मधील प्रसिद्ध डॉ अभिजित पाटसकर यांनी या कामात मोलाची मदत केली ,त्यांनी स्वतः सुध्दा 10 किलो वजन सॅक मध्ये घेऊन चढाई केली,त्याचा 12 वर्षीय मुलगा श्रीरंग सुद्धा सहभागी झाला शिरवलीचे ग्रामपंचायत सदस्य सुरेंद्र पालांडे यांनी देखील सहकार्य केले तसेच प्रशासनाने मार्गदर्शन लाभले, सदर मदत महाराष्ट्रातील सर्व गिर्यारोहण संस्थांची शिखर संघटना अखिल महाराष्ट्र गिर्यारोहण महासंघामार्फत आमच्याकडे आली व आम्ही सर्वांनी मिळून ती नुकसानग्रस्त नागरिकांपर्यंत पोहचविली असल्याचे महाडचे सुप्रसिद्ध डेंटिस्ट व उत्क्रुष्ट गिर्याराेहक डाँ राहुल वारंगे यांनी प्रसारमाध्यमांशी बाेलताना सांगितले आहे गिर्याराेहक संघटनेच्या या मदत कार्याचे संपुर्ण रायगड जिल्ह्यातुन काैतुक हाेत आहे.
Be First to Comment