धक्कादायक : पिंट्याशेठ पाटील यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन
पेण । प्रतिनिधी ।
पेण तालुक्यातील शेकापचे झुंजार नेतृत्व करणारे, सर्वसामान्यांच्या न्याय हक्कासाठी रस्त्यावर उतरणारे, अन्यायाविरोधात आवाज उठविणारे युवानेते प्रमोद पाटील उर्फ पिट्याशेठ हे काळाच्या पडद्या आड गेले.
मंगळवारी (दि.4) त्यांनी अचानक एक्झिट घेतल्याने तालुक्यातील प्रत्येक कार्यकर्ता पोरका झाला. प्रमोद पाटील जिल्हा परिषदेचे विद्यमान सदस्य होते. त्यांनी काही काळ कृषी सभापती पद भुषवले होते.
त्याच्या निधनाने एक धडाडीचा युवानेता काळाच्या पद्याआड गेला आहे. शेकाप आमदार जयंत पाटील, माजी आ. धैर्यशिल पाटील, मा.आमदार पंडीत पाटील यांनीही हळहळ व्यक्त केली आहे.








Be First to Comment