शेकाप कार्यकर्त्यांसह काळूंद्रे गावावर शोककळा
सिटी बेल । पनवेल ।
शेतकरी कामगार पक्षाचे पनवेल महानगरपालिकेतील सहचिटणीस आर डी घरत यांचे आज हृदयविकाराच्या झटक्याने दुख:द निधन झाले.
आर डी घरत हे अत्यंत झुंजार नेते म्हणून संपूर्ण जिल्ह्यात परिचित होते. काँग्रेस नेते, माजी मुख्यमंत्री ए आर अंतुले यांचे ते निकटवर्तीय मानले जात असत. मनोहर जोशी मुख्यमंत्री असताना संपूर्ण महाराष्ट्रात उत्कृष्ट सरपंच म्हणून त्यांनी पारितोषिक मिळावीले होते. संपूर्ण पनवेल तालुका शेतकरी कामगार पक्षाचा बालेकिल्ला असताना त्यांनी आपला विभाग काँग्रेस सोबत जोडून ठेवला होता.
काळूंद्रे गावातील सरपंच पद असो अथवा पंचायत समिती सदस्य असो त्यांनी आपला गड कायम राखला होता. कालांतराने त्यांनी शेतकरी कामगार पक्षात प्रवेश केला आणि त्यानंतरच शेकापला काळूंद्रे ग्रामपंचायतीवर लाल बावटा फडकवता आला. त्यानंतर त्यांच्या पत्नी जिल्हा परिषद सदस्य देखील झाल्या.
आर डी घरत हे अत्यंत झुंजार नेते म्हणून ओळखले जात होते. नैना संघर्ष समिती मध्ये देखील त्यांची भूमिका महत्त्वाची होती. पनवेल मधील पत्रकारांचे दखील ते आवडते मित्र होते. आज त्यांच्या अचानक जाण्याने संपूर्ण शेतकरी कामगार पक्षाच्या कार्यकर्त्यांवर तसेच त्यांच्या चाहत्यांवर शोककळा पसरली आहे.
आर डी घरत यांना सिटी बेल परिवारातर्फे भावपूर्ण श्रद्धांजली !








Be First to Comment