नागोठणे पत्रकार संघाचे अध्यक्ष शैलेंद्र देशपांडे यांचे निधन
सिटी बेल । रोहा । धम्मशील सावंत ।
रोहा तालुक्यातील नागोठणे पत्रकार संघाचे अध्यक्ष तसेच दै.सामनाचे बेधडक पत्रकार शैलेंद्र विजय देशपांडे यांचे वयाच्या 52 व्या वर्षी मुंबई येथील रुग्णालयात औषोधोपचारा दरम्यान निधन झाले. नागोठणे विभागात राजादादा नावाने परिचित होते.
अत्यंत प्रेमळ व मनमिळावू स्वभावाचे होते. ते नागोठणे ग्रामपंचायत निवडणुकीत सलग पाच वेळा निवडून येऊन गेली 25 वर्षे जनतेची सेवा करीत होते.नुकतीच त्यांनी आपल्यावर पडलेली उपसरपंचाची जबाबदारी यशस्वीपणे पार पाडली. नागोठणे पत्रकार संघाचे अध्यक्ष पदही ते यशस्वी रित्या सांभाळीत होते. गोरगरीब सर्वसामान्य अडलेल्या नडलेल्या लोकांना ते सतत मदत करायचे. अन्याया विरुद्ध दैनिक सामनामध्ये वेळोवेळी आवाज उठवून अन्यायग्रस्तांना ते नेहमी न्याय देण्याचा प्रयत्न करीत होते.
समाजसेवेची विविध पदे भूषविलेले तसेच गरीब गरजू जनतेच्या मदतीला रात्री अपरात्री धावून जाणारा राजादादा सारख्या दिलदार मनाचे व्यक्तिमत्व हरपल्याने विभागात दू:खाची छाया पसरली असून नागोठणे पत्रकार संघासह नागोठणे शहराची खूप मोठी हानी झाली आहे.








Be First to Comment