सिटी बेल । खांब-रोहा । नंदकुमार मरवडे ।
रोहे तालुक्यातील नडवली गावचे रहिवासी तथा युवा सामाजिक कार्यकर्ते भगवान महादेव शिर्के यांच्या झालेल्या आकस्मिक निधनाने संपूर्ण नडवली गावावर शोककळा पसरली असून त्यांच्या या निधनाने परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.म्रुत्यूसमयी ते ४५ वर्षांचे होते.
भगवान शिर्के यांना राहत्या घरी एकाकी अस्वस्थ वाटू लागल्याने ग्रामस्थांनी त्यांना शर्थीचे प्रयत्न करून दवाखान्यात नेले असता उपचारापूर्वीच त्यांची प्राणज्योत मावळली होती.स्वतःच्या पोटापाण्यासाठी ते लाऊडस्पीकरच्या आँर्डर घेणे व इलेक्ट्रॉनिक सामान विक्रीचा व्यवसाय करीत असत.सर्वांशी प्रेमाने व नम्रपणे वागणा-या व सामाजिक कार्यक्रमात नेहमीच सक्रिय असणाऱ्या भगवान शिर्के यांचे आकस्मिक झालेले दु:खद निधन म्हणजे गावाला चटका लाऊन जाणारी घटना असून सहनशक्तीच्या पलीकडील घटना
असल्याची प्रतिक्रिया ऐकावयास मिळत आहे.तर अतिशय शोकाकूल परिस्थितीत व जड अंत:करणाने त्यांच्यावर ग्रामस्थ व आप्तस्वकीय तसेच मित्रपरिवार यांनी अंत्यसंस्कार केले.त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुलं,पुतणे,बहिण असा परिवार आहे.








Be First to Comment