सिटी बेल । नागोठणे । महेश पवार ।
नागोठण्यातील हाॅटेल साईप्रसादचे मालक ऊमाजीशेठ चव्हाण (रा. तामसोली, ता. रोहा) यांचे वडील ह. भ. प. झिटु गोपाल चव्हाण (९२) यांचे वृद्धपाकाळाने दुख:द निधन झाले. त्यांच्यावर तामसोली येथिल वैकुंठ स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन विवाहित मुले, तीन विवाहित मुली, जावई, सुना, नातवंडे, पतवंडे असा मोठा परिवार आहे.
वै. ह. भ. प. झिटु चव्हाण यांनी आपल्या जीवनातील अधिक काळ हा वारकरी सांप्रदयात घालविला. चेह-यावर नेहमीच हसु असणा-या झिटु चव्हाण यांनी संपुर्ण नागोठणे विभागासह ऐनघर परिसरामध्ये आपल्या कर्तुत्वाचा चांगल्या पद्धतीने ठसा उमटविला होता. त्यांनी आपल्या सर्व कुंटुबाला चांगले वळण लावत आपल्या मुलाला हाँटेल व्यवसायातही चांगली वाटचाल करुन दिली. झिटु चव्हाण यांच्या निधनाने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.
झिटु चव्हाण यांच्या अंत्ययात्रेवेळी वारकरी सांप्रदाय, सामाजिक, राजकीय क्षेत्रातील रोहा-, सुधागड, माणगाव,अलिबाग येथिल मोठा मित्र परिवार जमला होता. वै. झिटु चव्हाण यांचे दशक्रिया विधी बुधवार दि. २८ एप्रिल रोजी अंबा नदि घाटावर तर उत्तरकार्य शनिवार दि. १ मे रोजी राहत्या घरी तामसोली येथे होणार असल्याचे चव्हाण परिवाराकडुन सांगण्यात आले आहे.








Be First to Comment