कोरोना महासंकटात कंपन्याचे मोठे नुकसान, कच्चा माल मिळत नाही व उत्पादन कंपनीत पडून
सिटी बेल । तळोजा । विकास पाटील ।
देशासह राज्यात दिड वर्षांपासून कोरोनाचे संकट आहे. रुग्ण उपचाराविना तडफडत आहेत. एवढी भयानक परिस्थिती आहे या कोरोना महामारीवर मात करण्यासाठी व कामगारांचे कोरोना साथीपासून संरक्षण करण्यासाठी तळोजा मँन्युफँक्चर असोसिएशनने कोरोनाची आरटीपीसीआर व अँन्टीजन तपासणी शिबिराचे दोन दिवसाचे आयोजन तळोजामध्ये करण्यात आले यावेळी २१८ जणांची तपारणी करण्यात आली.
पनवेलमध्ये कोरोनाने थैमान घातले आहे. पनवेल शहरात दररोज पाचेशपेक्षा जास्त आणि ग्रामीण भागात अडीचशेपेक्षा जास्त रूग्ण आढळून येत आहेत रुग्णाच्या वाढत्या संख्येमुळे रुग्णांना बेड मिळत नसल्याने उपचाराविना रुग्णांची हेलसांड होत आहे अशा विदारक परिस्थितीवर काही प्रमाणात मात करण्यासाठी तळोजा औद्योगिक वसाहतीत येणा-या कामगारांची तळोजा मँन्युफँक्चर असोसिएशनचे अध्यक्ष शेखर शुंगारे व त्यांच्या सहकार्यांच्या प्रयत्नातून दोन दिवसाचे कोरोना तपसणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. याला कामगारांतीन उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. कोरोनाचा संसर्ग वाढुू नये बाधित कामगारांवर तातडीने उपचार व्हावे हा उद्देश समोर ठेवून शासनाच्या आदेशाची अंमलबजावणी केली.
कंपन्यामध्ये येणाऱ्या कामगारांची प्रवेशद्वारावर कसून वैद्यकीय तपासणी करून सँनेटाझर केले जाते. आजार पुन्हा बळावू नये किंवा पुनरावृत्ती होऊ नये यासाठी कंपन्याकडून सर्वतोपरी खबरदारी घेतली जात आहे. कोरोनाच्या महामारीत कंपन्याचे मोठे नुकसान झाले आहे. असे शेखर शुंगारे यांनी सांगितले.
भारतासह जगभरातील अनेक भागांत माणसांच्या हालचाली, साधन सामुग्री आणि वाहतूक आदी सर्वच क्षेत्रांना एकप्रकारे लकवाच मारला आहे. सगळे ठप्प झालेय. सेवा क्षेत्रातील लहान, मोठे उद्योग ‘वर्क फ्रॉम होम’च्या माध्यमातून हे नुकसान भरून काढण्याचा प्रयत्न करत आहेत. पण कच्चा माल वेळेवर मिळत नसल्याने व तयार झालेले उत्पादन कंपनीतच पडून असल्याने कंपनी मालक रडकुंडीला आले आहेत त्यात कोरोना बाधित व विलगीकरण झालेल्या कामगाराला कुटूबाच्या सदस्याप्रमाणे सांभाळावे लागते त्यामुळे कंपन्याना मोठ्या नुकसानीला सामोरे जावे लागत आहे काही उत्पादन क्षेत्रे, लॉजिस्टिक्स, वस्तू व सेवा क्षेत्रातील अर्थव्यवस्थेबरोबरच सर्वच क्षेत्र पूर्णपणे कोलमडून पडली आहेत. या साऱ्या उद्रेकाचे भारतासह जागतिक अर्थव्यवस्थेवर मोठा परिणाम झाला आहे.
आज या महासंकटाने जगातील एक मोठा भाग व्यापला आहे आणि व्यापाराचा मार्ग पूर्णपणे थोपवून धरला आहे. अज्ञात किंवा अनिश्चित कालावधीत अर्थव्यवस्थाच ‘लॉकडाऊन’ किंवा पूर्णपणे ठप्प करणारे हे वर्तमानकाळातील संकट ‘आत्मविश्वासाचे संकट’ ठरले आहे. हेच याचे प्रमुख कारण आहे. वर्तमानकाळातील संकट हे खूपच वेगळे आहे. कारण त्यात भीती, चिंता, अनिश्चितता निर्माण झाली आहे. पूर्वीच्या सर्व परिस्थितीच्या उलट, जिथे मागणी किंवा पुरवठा हे मूळ कारण होते आणि आत्मविश्वास हे संकट होते. मालाचे उत्पादन आणि पुरवठा किंवा वितरणाची साखळीच पूर्णपणे विस्कळीत झाली आहे. कारण अत्यावश्यक सेवा वगळता, सर्वच कामे ठप्प झाली आहेत आणि लॉजिस्टिक सुविधा बंद झाली आहे. जोपर्यंत या विषाणूचा प्रादुर्भाव कमी होत नाही, तोपर्यंत वाट पाहावी लागणार आहे. अशीच परिस्थिती दीर्घकाळ राहिली तर, याचे गंभीर परिणाम होऊन अर्थव्यवस्थेला पुन्हा उभारी घेण्यासाठी अधिक काळ लागू शकतो. कंपनीतील एखादा कामगाराला कोरोना झाला कीवा विलगीकरण करण्यात आले तर त्या कामगाराला कुटुंबातील सदस्याप्रमाणे सांभाळावे लागत आहे. कोरोनाच्या महामारीत कंपन्याचे मोठे नुकसान झाले होत आहे
शेखर शंगारे, अध्यक्ष – तळोजा मँन्युफँक्चर असोसिएशन








Be First to Comment