सबंध पंचक्रोशी शोकाकुल
सिटी बेल । धाटाव । शशिकांत मोरे ।
रोहे तालुक्यातील पिंगळसईचे माझी सरपंच अनंत देशमुख यांच्या मातोश्री लीलाबाई अंकुश देशमुख यांना नुकतीच वृद्धापकाळाने देवाज्ञा झाली. निधनासमयी त्यांचे वय ७५ वर्षे होते.त्यांच्या निधनाने देशमुख कुटुंबीयांसह सबंध पंचक्रोशीतील वातावरण शोकाकुल झाले आहे.
अतिशय प्रेमळ,सर्वांशी मिळून मिसळून वागणा-या लीलाबाई सर्व आप्तस्वकीय,मित्र परिवार यांच्यामध्ये विशेष प्रिय होत्या.कुटुंबात शांत सय्यमि आणि प्रेमळ स्वभामुळे सर्वांनाच त्या खुप आवडत्या होत्या.आपल्या सुनांवर त्यांनी मूली सारखे प्रेम केले.पारंपारिक सणासुदित कार्यक्रमात त्यांचे मार्गदर्शन मोलाचे ठरत असत.
त्यांच्या पश्चात दोन मुले,चार मुली,सुना,जावई,नातवंडे असा परिवार असून त्यांचे दशक्रियाविधी बुधवार २१ एप्रिल तर उत्तर कार्य विधी शनीवार २४ एप्रिल रोजी पिंगळसई येथील राहत्या निवासस्थानी करण्यात येणार आहेत.








Be First to Comment