सिटी बेल लाइव्ह / खांब-रोहे (नंदकुमार मरवडे)
गेली अनेक दिवस गायब झालेल्या पावसाने पुन्हा एकदा आपले अस्तित्व दाखवायला सुरूवात केल्याने बळीराजा तर समाधानी झाला आहेच याशिवाय तरुणाईची देखील वल्गनीचे मासे पकडण्यासाठीची एकच लगबग दिसून येत आहे.
जून महिन्याच्या दुस-या आठवड्यात झालेला दमदार पाऊस माश्यांची वल्गन चढण्यालायक नव्हता.त्यामुळे खवय्यांची पुरती निराशा झाली होती.त्यातच गेली पंधरा दिवस पाऊस गायब झाल्याने सर्वांच्याच तोंडचे पाणी पळाले होते.अशातच जुलै महिन्याच्या सुरूवातीलाच पावसाने दमदार सुरुवात केल्याने सर्वांनाच आनंद झाला आहेच याशिवाय वल्गनीचे मासे चढण्यासाठी चांगला पाऊस झाल्याने व योग्य परिस्थिती निर्माण झाल्याने नदी काठचे ओढे,सखल भाग व शेतीच्या क्षेत्राचे पाण्यामध्ये मोठ्या प्रमाणावर मासे दिसून आल्याने तरूणाईने मोठ्या प्रमाणावर मासेमारी करून पावसाळ्यातील वल्गनीचा आनंद घेत आहेत.
सध्या कोरोना व्हाईरसमुळे सर्वत्र ल्वाकडाऊन असल्यामुळे प्रत्येकजण हा आपापल्या घरी सुरक्षितच आहे.बरेच दिवस घरी बसल्याने त्याच त्याच मनोरंजनाच्या साधनांनी जो तो कंटाळला आहे.त्यातच दोन दिवस चांगला पाऊस झाल्याने आपापला क्षीण घालविण्यासाठी तरूणाईने सरळ वल्गनीचे मासे पकडण्यासाठी नदी किनारे,ओव्हळ,नाले,शेती क्षेत्राचा रस्ता धरून ठिकठिकाणी मोठ्या प्रमाणावर चढलेल्या वल्गनीचे मासे मारण्याचा आनंद लुटला जात आहे.
Be First to Comment