Press "Enter" to skip to content

संजयशेठ अग्रवाल यांचे अल्पशा आजाराने निधन

सिटी बेल । नागोठणे । महेश पवार ।

नागोठण्याजवळील वरवठणे येथील रहिवासी आणि वरवठणे व सुकेळी येथील किराणा मालाचे प्रसिद्ध व्यावसायिक संजयशेठ गिरिधरलाल अग्रवाल (वय ५३) यांचे पुणे येथील जंबो रूग्णालयात अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर पुणे येथेच अंत्यसंस्कार करण्यात आले.

दिवंगत संजयशेठ अग्रवाल यांच्या पश्चात पत्नी, अशिष व जीवन हे दोन विवाहित मुलगे, सुना यांच्यासह मोठा परिवार आहे.

वरवठणे सारख्या ग्रामीण भागात किराणा मालाचे दुकान सुरु करुन कै. संजय अग्रवाल यांनी आपले वडिल कै. गिरिधरलाल अग्रवाल यांच्याप्रमाणे आपल्या प्रेमळ स्वभावाने माणुसकीही जपली होती. किराणा मालाचा व्यवसाय करीत असतांनाच त्यांनी ग्राहकाला नेहमीच देव समजून आपला व्यवसाय केला. कधी कुणाकडे किराणा सामानाचे पैसे द्यायला नसले तरीही त्यांनी उधारीमध्येही व्यवसाय करुन आर्थिक झळही सोसली. वरवठणे गावात नेहमीच सर्वांना मदत करणारे व अडीअडचणीला धावून जाणारे अशी त्यांची ओळख होती. त्यांच्या याच स्वभावामुळे त्यांचा मोठा मित्रपरिवार आहे. कै. संजयशेठ यांनी काही दिवसांपूर्वीच सुकेळी येथेही किराणा मालाचे दुकान सुरु केले होते. शांत, संयमी व मनमिळाऊ स्वभावाच्या संजयशेठ अग्रवाल यांच्या अशा या अकाली निधनाचे वृत्त समजताच नागोठणे शहर व ग्रामीण भागात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.