Press "Enter" to skip to content

गणपत ठाकुर यांना देवाज्ञा

सिटी बेल । आवरे । कौशिक ठाकूर ।

आवरे गाव ही विशेष नर रत्नाची खाण होय, कर्मपूजा ही या जीवनात खूप मोठी असते. आवरे गावातील प्रतिष्ठित नागरिक, उत्तम कारागीर ,टेलरिंग या आपल्या व्यवसायत नावलौकिक पूर्वविभागात मिळविणारे, सर्व आप्त नातलग यांच्या सुख-दुःखात हिरारीने भाग घेणारे आपल्या वडिलोपार्जित टेलर व्यावसायिक जीवनात आपल्या कुटुंबाला उत्तम दिशा देणारे आणि नवोदित अश्या सर्व टेलर काम करणाऱ्यांना अमौलीक मार्गदर्शन करणारे आवरे गावचे रहिवासी गणपत रामदास ठाकूर यांना गुरुवार दिनांक 1/4/2021रोजी देवाज्ञा झाली.

त्यांचे उत्तर कार्य 12 /4 /2021 रोजी राहत्या घरी होणार आहे त्यांच्या जाण्याने टेलरिंग क्षेत्रात एक कमालीची उणीव निर्माण झाली आहे. त्यांच्या पश्चात पत्नी दोन मुले एक मुलगी , सुना पत्नी व नात असा परिवार आहे.आपल्या नातलग यांनी कोणत्याही प्रकारचा दुखवटा वस्तू आणू नये ही विनंती सर्वाना केली आहे. दुःखात असलेले समस्त ठाकूर परिवार व आप्तेष्ट व कै मधुकर ठाकूर प्रतिष्ठान आहे. ईश्वर त्यांच्या आत्म्याला चिरशांती देवो ही प्रार्थना अश्या प्रकारे गणपत ठाकूर याना देवाज्ञा झाल्याने ठाकूर कुंटुंबाचे फार मोठे नुकसान झाले आहे.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.