सिटी बेल । नागोठणे । महेश पवार ।
नागोठणे ग्रामपंचायतीचे माजी सरपंच तथा श्री अष्टविनायक पतसंस्थेचे अध्यक्ष विलास चौलकर यांचे काका हभप दत्तात्रेय विठोबा चौलकर यांचे सोमवार दि.२२ मार्च २०२१ रोजी वृद्धापकाळाने दुःखद निधन झाले. त्यानिमित्त राष्ट्रवादी काँग्रेसचे नागोठणे विभागीय नेते तथा नागोठणे व्यापारी पतसंस्थेचे अध्यक्ष नरेंद्रशेठ जैन व व्यापारी पतसंस्थेचे उपाध्यक्ष भाई टके यांनी कै. दत्तात्रेय चौलकर यांच्या निवासस्थानी भेट देऊन विलास मारुती चौलकर, मधुकर विठोबा चौलकर, संजय दत्तात्रेय चौलकर, सचिन दत्तात्रेय चौलकर, संतोष दत्तात्रेय चौलकर, जगदिश मधुकर चौलकर यांचे सांत्वन केले.
दरम्यान हभप कै. दत्तात्रेय चौलकर यांनी नागोठणे गवळआळीतील श्री राधाकृष्ण साईबाबा मंदिर पुजारी म्हणून चांगल्या प्रकारे सेवा केलीआहे.








Be First to Comment