सिटी बेल । नागोठणे । महेश पवार ।
नागोठणे कुंभार आळी येथील रहिवासी जानकीबाई रामचंद्र नागोठणेकर (वय ८१) यांचे बुधवार दि.३१ मार्च २०२१ रोजी रात्री ११.३० वा त्यांच्या कुंभार आळी येथील राहत्या घरी वृद्धपकालाने निधन झाले. कुंभार आळीतील समाजिक कार्यकर्ते व नागोठणे ग्रामपंचायतीमध्ये अनेक वर्षे निस्वार्थीपणे सेवा बजावणारे निवृत्त वरीष्ठ कर्मचारी विजय नागोठणेकर यांच्या मातोश्री होत.
गुरुवार दि.०१ मार्च रोजी सकाळी सहा वाजण्याच्या सुमारास नागोठणे कुंभार आळी येथील स्मशानभूमीमध्ये जानकीबाई यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले.यावेळी नागोठणे केएमजी विभाग, नागोठणे शहर व परिसरातील नागरिक व नातेवाईक तसेच समाज बांधव उपस्थित होते. कै. जानकीबाई यांच्या पश्चात विजय व सुनिल ही दोन मुले , सूना , नातवंड ,पतवंड असा मोठा परिवार आहे. मानाने खूपच प्रेमळ व मनमिळाऊ स्वभावाच्या असणाऱ्या कै. जानकीबाई यांचे दशक्रिया विधी शुक्रवार दि.०९ एप्रिल रोजी कुंभार आळी येथील श्रृंगार तलाव येथे होणार असून सोमवार दि.१२ एप्रिल रोजी राहत्या घरी उत्तर कार्य विधी होणार असल्याचे नागोठणेकर कुटुंबीयाकडून सांगण्यात आले आहे.








Be First to Comment