उरण तालुक्यातील वारकर्यांची पंढरी म्हणून प्रसिद्ध क्षेत्र नागांव येथील जीवन मुक्त स्वामी महाराज मठाचे अध्यक्ष नगराज शेठ यांच्या हस्ते अभिषेक सोहळा संपन्न
सिटी बेल लाइव्ह / उरण/ रमेश थळी #
उरण तालुक्यातील श्रीमत् परमहस विरक्ताश्रम जीवन मुक्त स्वामी महाराज मठ हे वारकर्यांची पंढरी म्हणून प्रसिद्ध आहे. या मठात प्रति वर्षीआषाढी एकादशी,गुरु पुर्नीमा, वामन द्वोरदशी,पालखी सोहळा,मठाचा वर्धापनदिन सोहळा असे वर्षभर विविध कार्यक्रम होत असतात या कार्यक्रमात अखंड हरीनाम सप्ताहहरीपाठ,,पारायण,ज्ञानेश्वरी प्रवचन,कीर्तन,भजन,असे विविध कार्यक्रम सुरू असतात या कार्यक्रमात हजारोंच्या संखेने भाविक दर्शन घेण्यासाठी हजेरी लावतात मात्र या वर्षी राज्यात सर्व ठिकाणी कोरोना विषाणूंचा पादुर्भाव वाढला असल्याने या वर्षी शासकीय नियम जारी केले असल्याने या नियमांचे पालन करून सुरक्षित अंतर राखुन तोंडाला माक्स बांधून जीवन मुक्त स्वामी महाराज देवस्थानाचे अध्यक्ष उरण नगरीचे माजी नगराध्यक्ष श्री नगराजशेठ यांच्या हस्ते अभिषेक व काकड आरती सोहळा पार पडला या सोहळ्यास मदनिस म्हणून मठाचे विश्वत जेष्ठ पत्रकार प्रवीण पुरो,जनार्दन थळी,आत्माराम थळी,एड डी के पाटील शशीकांत पाटील उपस्थित होते.या जीवन मुक्त स्वामी महाराज यांच्या विषयी अधिक माहिती विश्वस्त जेष्ठ पत्रकार प्रवीण पुरो यांनी देताना ते म्हणाले इ १९०४ साली महाराज सिंध प्रांतातून महाराष्ट्रात उरण येथे आले आणि या ठिकाणची जागा निश्चीत केली तेव्हा पासून हा सोहळा सुरू आहे हा सोहळा सर्वात मोठा सोहळा होतो ज्या भावीकांना पंढरपूरला जाणे शक्य होत नाही ते भाविक या ठीकाणी येउन स्वामींचे दर्शन घेण्यासाठी या ठीकाणी मोठ्या संखेने येतात या वर्षी राज्यात कोरोना विषाणूंचा पादुर्भाव असल्याने सर्व धार्मिक स्थलांवर निर्भंध आहेत त्याचा सर्वानी आदर शासकीय नियम पाळून शासनाला सहकार्य करावे असे आवाहन भावीकांना केले व ते पुढे म्हणाले आज देशा च्या सरहद्द सुरक्षित नाहीत आपले जवान सीमेवर लढत आहेत काही कीनारे असुरक्षित आहेत या ठीकाणी बंदोबस्त असवा अशी खंत या वेली त्यांनी व्यक्त केली
Be First to Comment