आमदार बाळाराम पाटील यांच्या पुढाकाराने पालक मंत्र्यांसोबत बैठकीचे आयोजन.
सिटी बेल/ मुंबई
महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाने पाईप लाईनसाठी संपादीत केलेल्या मौजे चाळ, ता. पनवेल, जिल्हा रायगड येथील जमीनीचे ३० वर्षापासून असलेले भाडे व नुकसान भरपाई मिळणेबाबत पालकमंत्री आदिती तटकरे यांच्या अध्यक्षतेखाली बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.
बैठकीस आमदार श्री. बाळाराम पाटील, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी श्री. मलीकनेर, मुख्य अभियंता श्री. वाघ, भूसंपादन महाव्यवस्थापक श्री. ठोंबरे, महापे प्रादेशिक अधिकारी श्री. बागल, कार्यकारी अभियंता श्री. ननवरे, उद्योग विभागाचे अवर सचिव श्री. किरण जाधव, नगरसेवक श्री. अरविंद म्हात्रे, श्री. गणेश कडू, श्री. ज्ञानेश्वर पाटील, मा.सभापती श्री. काशिनाथ पाटील आदी उपस्थित होते.
Be First to Comment