सिटी बेल लाइव्ह / उरण(घन:श्याम कडू)
आज उरणमध्ये १४ पॉझिटीव्ह, १२ जणांना घरी सोडण्यात आले तर एकाचा कोरोनाने मृत्यू झाला आहे.
जसखार १, म्हातवली १, खोपटे धसाखोसी १, क्लासिक अवेन्यु एनआय हायस्कुल नागाव रोड १, वशेणी १, जसखार जेएनपीटी रोड १, किरण सोसायटी करंजा रोड १, गणेश नगर करंजारोड ३, भेंडखळ २, मुळेखंड कोळीवाडा १, मोठी जुई १ असे एकूण १४ जण पॉझिटीव्ह आढळले आहेत. सारडे १, उरण २, जासई १, जसखार ३, मोरा २, वेश्वि १, बोकडविरा १, चिरनेर १असे १२ जणांना घरी सोडण्यात आले. तर कोप्रोली येथील कोरोनाग्रस्ताचा मृत्यू झाला आहे.
एकूण पॉझिटीव्ह ६४१, बरे झालेले ४५९, उपचार घेणारे १६४ तर मयत १८ असल्याची माहिती तहसीलदार भाऊसाहेब अंधारे यांनी दिली.
उरणमध्ये कोरोना पॉझिटीव्हचा आकडा वाढतानाच दिसत आहे. त्यात काल गटारीही जोरात साजरी करण्यात आली आहे. त्यावेळी सोशल डिस्टंटचा फज्जा उडाल्याचे दिसत होते. त्यामुळे कोरोना पॉझिटीव्हचा आकडा येत्या एक दोन दिवसांत वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही.






Be First to Comment