सिटी बेल लाइव्ह / कर्जत (संजय गायकवाड)
कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे देशात लॉक डाऊन करण्यात आले होते, याबाबत सरकारचे काही निर्देश होते, तीन महिन्यांच्या कालावधीत विज वितरण कंपनीने ग्राहकांना वीज देयके पाठवली नाहीत, मात्र आता पाठवलेली वीज देयके ही मोठ्या रक्कमेची आहेत ही ग्राहकांना भरणे आता परवडणारे नाही म्हणून कर्जत भाजपच्यावतीने वीज वितरण कंपनीला आज दि.4 जुलै रोजी निवेदन देण्यात आले. देयके कमी झाली नाहीत तर आंदोलन करण्यात येईल असा ही इशारा निवेदनात देण्यात आला आहे.
भरमसाठ विजबिले पाठविली आहेत त्याबाबत किसान मोर्चा प्रदेश चिटणीस सुनील गोगटे,उपनगराध्यक्ष अशोक ओसवाल, जिल्हा सरचिटणीस दीपक बेहेरे, नगरसेवक बळवंत घुमरे, नगरसेविका स्वामीनी मांजरे, जिल्हाध्यक्ष उद्योग आघाडी मंदार मेहेंदळे, तालुका अध्यक्ष महिला आघाडी स्नेहा गोगटे, उपाध्यक्ष गायत्री परांजपे, सुर्यकांत गुप्ता, मयूर शितोळे, हरीश ठाकरे, सर्वेश गोगटे यांनी वीज वितरण कंपनीच्या कार्यालयात जावुन वीज वीज वितरण कंपनीच्या कार्यालयामध्ये जाऊन उपकार्यकारी अभियंता अनंत घुले यांची भेट घेवून त्यांना निवेदन सादर केले.
बिले त्वरित दुरुस्त करून द्यावीत तसेच दोन तीन हफ्ते करून घ्यावेत म्हणजे सद्य परिस्थिती लोकांना ते भरणे सोपे होईल अशी मागणी निवेदनाद्वारे केली. महावितरण चे अभियंता घुले यांनी ती मान्य करून ग्राहकांना योग्य ते सहकार्य करू असे आश्वासन दिले.
Be First to Comment