सिटी बेल लाइव्ह / मुंबई-(पंकजकुमार पाटील) :
कांजुरमार्ग (पुर्व )येथील बालयुवक साई उत्सव मंडळ, मिराशी नगर व माऊली प्रतिष्ठान (रजि)यांच्या वतीने व ब्लड बँक जे. जे. शासकीय रुग्णालय, भायखळा यांच्या सहकार्याने विक्रोळी विधानसभा आमदार सुनिलभाऊ राऊत यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य रक्तदान शिबीराचे आयोजन रविवार दि. १९ जुलै २०२० रोजी सकाळी १०:०० ते ०३:०० या वेळेत सेंट फ्रान्सिस झेविअर्स हायस्कूल (चर्च शाळा ), मेन मार्केट, कांजुरमार्ग (पूर्व) याठिकाणी करण्यात आले होते.
शासनाच्या सर्व नियम- अटींचे पालन करून विभागातील विद्यमान आमदार सुनील (भाऊ )राऊत आणि
शिबिराचे मुख्य आयोजक मान. विठ्ठलशेठ बबन नाकाडे(संस्थापक /अध्यक्ष-माऊली प्रतिष्ठान) यांच्या प्रमुख उपस्थितीत सदर शिबिर पार पडले. मुंबईसह महाराष्ट्र व संपूर्ण जगभरात पसरलेल्या कोरोना या आजारामुळे अस्मानी संकट ओढवले आहे. या कठीण परिस्थितीत रक्ताचा तुटवडा भासू नये यासाठी सामाजिक बांधिलकी म्हणून बालयुवक साई उत्सव मंडळ व माऊली प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने सदर 'रक्तदान शिबिर' आयोजित केले गेले होते.
विशेषतः रक्तदानासाठी येणाऱ्या रक्तदात्यांना शिबिरा ठिकाणी बसवलेल्या स्वयंचलित सॅनिटायझर प्रवेशयंत्राद्वारे सॅनिटायझर स्प्रे (फवारणी ) करून आत घेतले जात होते. तसेच गैरसोय टाळण्याकरिता महिला रक्तदात्यांची येथे स्वतंत्र बेडची व्यवस्था करण्यात आली होती.
यावेळी या शिबिरास भरघोस प्रतिसाद देताना विभागातील जवळपास १५८ रक्तदात्यांनी रक्तदान करून आपली सामाजिक बांधिलकी निभावली. या सर्व रक्तदात्यांना भेटवस्तू म्हणून अन्नधान्याचे किट व मेडिकल किट ( ज्यामध्ये सॅनिटायझर ,हॅन्डवॉश ,मास्क , मोबाईल कव्हर ,छत्री
फेसशील्ड मास्क इत्या . समावेश ) देऊन मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.
या शिबिरा दरम्यान विविध क्षेत्रातील मान्यवर व्यक्ती , तसेच स्थानिक नगरसेविका सुवर्णाताई करंजे यांच्यासह इतर राजकीय प्रतिनिधी यांनी उपस्थित राहून आयोजकांचे कौतुक केले . शिबीर यशस्वी करण्यासाठी सचिन हडकर व सिद्धार्थ कदम यांचे मोलाचे सहकार्य लाभले सोबत इतर सर्व कार्यकर्त्यांनी सुद्धा मेहनत घेतली.
शिबीर यशस्वी केल्याबद्दल सर्वांचे आभार व्यक्त करून यापुढे देखील असेच सामाजिक कार्य सुरु राहील असे मुख्य आयोजक विठ्ठलशेठ नाकाडे यांनी बोलून दाखवले.
Be First to Comment