लोना इंडस्ट्रीज यांच्या माध्यमातून देण्यात आले पी.पी. ई किट
सिटी बेल लाइव्ह / रसायनी #
लहान मुलांचे लसीकरण करण्यासाठी व वैद्यकीय अधिकारी यांस रुग्णांची तपासणी करण्यासाठी पी.पी. ई किट ची अत्यंत आवश्यकता होती. त्याचप्रमाणे खाजगी डॉक्टर ,फिरोज खान, व डॉक्टर रोटकर यांस रुग्णांची गैरसोय होवू नये , या कारणास्तव युवासेनेचे केळवने विभाग अधिकारी स्वप्नील भोवड व ग्राम पंचायत सदस्य वृषभ धुमाळ यांनी दखल घेवून , लोना इंडस्ट्री याना निवेदन दिले. त्यांनी त्या निवेदनांस मान्यता दिली व तातडीने पी.पी. ई किट उपलब्ध करून दिले.
त्यावेळी लोना इंडस्ट्री चे जनरल मॅनेजर गणेश मेनसे साहेब , अडमिन ऑफिसर समीर भालेकर , युवासेना अधिकारी स्वप्नील भोवड , शाखाप्रमुख राजेंद्र घोलप , ग्रामपंचायत सदस्य वृषभ धुमाळ , युवा उप अधिकारी अक्षय घोलप ,संतोष जाधव , महादेव कदम ,धनंजय भोईर, आदी ग्रामस्थ उपस्थित होते .






Be First to Comment