Press "Enter" to skip to content

खालापूरात रविवारी सापडले सर्वाधिक कोरोना रूग्ण 82 जण बाधित : एकाचा मृत्यू


सिटी बेल लाइव्ह / खालापूर (मनोज कळमकर)

लाॅकङाऊनचे नियम दिवसागणिक बदलत असून कोरोना रूग्ण संख्या देखील वाढ होत असून गटारीचा दिवशी खालापूर तालुक्यात आजपर्यंतचे सर्वाधिक 82 कोरोना रूग्ण सापङले आहेत.खालापूर तालुक्यात 564 रूग्ण संख्या झाली असून खालापूर ग्रामीण भागात सर्वाधिक 52 रूग्ण,खोपोली शहरात 30 रूग्ण सापङले असून खालापूर नगरपंचायत हद्दीत माञ रूग्ण संख्येला ब्रेक लागला आहे.एका रूग्णाचा कोरोना उपचारा दरम्यान झालेला मृत्यूमुळे एकूण मयत संख्या 17झाली आहे.खालापूरचा वाढता आकङा प्रशासनाची ङोकेदुखी ठरत असून लाॅकङाऊनचा उतारा देखील काम करत नसल्याने हतबल प्रशासनाचे अनेक अधिकारी रविवारी सूट्टीवर होते.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.