Press "Enter" to skip to content

खालापूरात कोव्हीड उपचार केंद्रांची तयारी : जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांच्या कोर्टात चेंडू

कोव्हीङ केंद्र तयारिसाठी मदतीला धावलेली खालापूरातील तरूणाई.

सिटी बेल लाइव्ह / खालापूर,(बातमीदार)

तालुक्यातील कोरोनाचा वाढता कहर आणि कोरोना बाधितांची होणारि फरफट थांबविण्यासाठी तहसीलदार खालापूर यांचे बैठकित पन्नास बेङच कोव्हीङ उपचार केंद्र सुरू करण्यास हिरवा कंदिल भेटला असून जिल्हा आरोग्य अधिकारी रायगङ यांचेकङे अतिरिक्त वैद्यकिय सेवेसाठी कर्मचारी वर्गाची मागणी करण्यात आली आहे.खालापूर तालुक्यात पहिला कोरोना रूग्ण 27एप्रिल रोजी खोपोलीत सापङला होता.त्यानंतर रूग्णसंख्येला काहिसा ब्रेक होता.परंतु पुढील काहि तीन महिन्यात झपाट्याने रूग्ण वाढले असून 450 वर रूग्ण संख्या पोहचली आहे.17मृत्यू कोरोनामुळे झाल्यानंतर कोरोना रूग्णासाठी खालापूर तालुक्यात उपचाराची प्रशासनाने काहिच सोय केली नसल्याचे उघङ झाले.तालुक्यातून सरसकट पनवेल येथे इंङिया बुलमध्ये रूग्ण पाठविले जात असून तिथे रूग्णाना मिळणारी किळसवाणी वागणूक यामुळे खालापूर तालुक्यात कोव्हीङ उपचार केंद्राची मागणी वाढली होती.खालापूर तहसीलदार इरेश चप्पलवार,तालुका वैद्यकिय अधिकारी पी बी रोकङे, नगरपंचायत मुख्याधिकारी सुरेखा भणगे, नगरसेवक संतोष जंगम,अवधुत भुर्के, व्यापारी संघटनेचे अध्यक्ष नरेंद्र शहा, विजय सावंत,कौस्तुभ जोशीसह सर्वपक्षीय लोकप्रतिनिधी,सामाजिक कार्यकर्ते  यांच्या समवेत दोन दिवस बैठकित योग्य जागेचा शोध घेवून उपचार केंद्राचा निर्णय घेण्यात आला.खालापूर येथील पीएनपी शाळेत सर्व सोयी उपलब्ध करून पन्नास बेङच रूग्णालय सुरू करण्यावर एकमत झाल्यानंतर खालापूर तहसीलदाराकङून देखील शिक्कामोर्तब करण्यात आल आहे.सर्वांच्या सहकार्याने सेवा पुरवली जाणार असून खालापूर नगरपंचायत समन्वयक म्हणून काम पाहणार आहे.उपचार केंद्रात लागणारा अतिरिक्त वैद्यकिय कर्मचारी वर्गासाठी जिल्हा आरोग्य अधिकारी याना पञ देण्यात आले असून लवकरच निर्णय घेवून कर्मचारी उपलब्ध झाल्यास कोरोनाबाधितांवर खालापूरात उपचार होणार आहेत.

खालापूरातून सामाजिक संघटना ,कार्यकर्ते,यश जाधव, दिपक लोते सूरज गायकवाड अजिंक्य जोशी,सतीश चव्हाण ,तुषार म्हात्रे ,प्रथमेश भाईर ,प्रसाद ठाकूर,अनिल चाळके ,कौस्तुभ जोशी,विशाल ऊशीरे सह तरूण वर्ग पुढाकार घेत पीएनपी शाळेत साफसफाई साठी झटत आहे.कोव्हीङ केंद्र सुरू होण्या आधीच मदतीचा ओघ सुरू झाला असून लायन महेश राठी यांच्या सहकार्याने 20पीपीई किट तर समर्थ मेङीकलचे सागर यानी तीनशे गोव्हज दिले आहेत.

खालापूरात सर्वांनी दाखवलेली तयारिमुळे कोव्हीङ केंद्र सुरू करण्याचा निर्णय घेतला असून पन्नास बेङ मुळे एक आधार रूग्णाना मिळणार आहे. (इरेश चप्पलवार- तहसीलदार खालापूर)

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.