Press "Enter" to skip to content

वेळ आली की….

वेळ आली की….

कुणी कोणासाठी थांबत नाही
वेळ आली की निघून जातात

आई वरील, भाऊ बहिण….
एकमेकाना जपत असतात.
वेळ आली की मात्र
न सांगता निघून जातात.
कुणी कुणासाठी थांबत नाहीत
वेळ आली की निघून जातात

जीवन असेपर्यंत सगळे जवळ
जीव गेला की सगळे विफळ
तरी सुद्धा भांडण करतो…
विनाकारण वैर धरतो…
कुणी कोणासाठी थांबत नाही
वेळ आली की निघून जातात.

पृथ्वीवरची मोह-माया
सगळे सोडून निघून जातात
सोबत काही घेऊन जात नाही
सगळे इथेच राहून जाते…
कुणी कोणासाठी थांबत नाही
वेळ आली की निघून जातात.

अपराजिता घांगुर्डे, खांदा कॉलनी

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.