Press "Enter" to skip to content

मुबंई गोवा महामार्गावरील पनवेल ते इंदापूर दरम्यान मार्गावरील प्रवास धोकादायक

कुंडलिका नदीवरील नव्या पुलावरील स्टील बाहेर आल्याने आपघातांचा धोका वाढला

सिटी बेल लाइव्ह / गोवे-कोलाड( विश्वास निकम )

मुबंई गोवा महामार्गाच्या चौपदरी करणाचे काम गेली आठ ते दहा वर्षांपासून सुरूच आहे इंदापूर ते पनवेल हा पहिला टप्याचे काम पूर्ण करण्यास शासनाच्या पदरी अपयश येत असल्याचे दिसून येत आहे आजपर्यंत या मार्गावरील कामाकरिता किती ठेकेदार आले किती गेले याचा हिशेबच नाही.त्यावर किती कोटी खर्च झाले याचा गणित नाही.काम केले रे केले की उखडले त्यामुळे प्रती वर्ष होत असलेला काम निकृष्ट दर्जाचा होत असल्याने एकच संताप व्यक्त होत आहे.

मुबंई गोवा महामार्गावरील ब्रिटिश काळातील दगड मातीतील पुलांची शंभरी पार तर आज कालचा पूल शंभर महिने ठिकणे ही बाब दूर तर चौविस महिन्यात कोलाड येथील कुंडलिका नदीपात्रावरील पूल अनेक वेळा संबधित ठेकेदारांनी दुरुस्त केला याचा अंदाज नाही मागील गणेश उत्सव कालात हा पूल वाहतुकीसाठी खुला करण्यात आला होता तद्नंतर या पुलावर मोठं मोठे खड्डे आणि पुलाच्या मधोमध लोखंडी सल्यांसह रस्ताच उखडून गेला तो दुरुस्त करून पुन्हा वाहतूक सुरू केली. पुन्हा तोच प्रकार असे चार पाच वेळा दुरुस्त झाली मात्र पुन्हा या पुलाची लॉकडाऊन मध्ये दुरुस्ती करून बाजूला असलेले ब्रिटिश कालीन जुना पूल तोडण्यात आले.त्या जागेवर नवीन पूल बनविण्याचे काम युद्ध पातळीवर आहे परंतु नव्या पुलावरील खड्डे आणि लोखंडी गज पुन्हा निघाल्याने वाहनचालकांची मोठी कसरत होत असून टू व्हीलर साठी मोठा धोका संभवतो आहे.

कोरोना लॉकडाऊनच्या कालावधीत नागोठणे कोलाड या मार्गाचे नव्याने चकाचक डांबरीकरण करण्यात आले मात्र या केलेल्या कामाला अद्याप शंभर दिवस देखील पूर्ण झाले नाहीत एप्रिल मेमहिन्यात केलेली कामे जूनच्या पहिल्याच पावसात खड्डेमय होत गेल्याने वाहनचालकांसह प्रवासी वर्गात एकच संताप व्यक्त केला जात आहे तर हे काम केले त्या दरम्यान कोणतीही जड अवजड वाहनांची वाहतूक देखील सुरू न्हवती पूर्ण वाहतूक कोरोना लॉकडाऊन टाळेबंदीत बंद असतांना हे काम केले गेले होते मात्र याच कामाचा धज्या उडत मोठं मोठे खड्डे पडल्याने अपघाता होण्याचे शक्यता नाकारता येत नाही.

मुबंई गोवा महामार्गाचे काम हे गेली १०ते ११सुरु आहे दरवर्षी पावसाल्या पूर्वी केली जातात पण तो केवळ देखावा आहे. त्याची दुरुस्तीची कामे पुन्हा पुन्हा करावी लागतात.या महामार्गावरील खड्डे मात्र जसेच्या तसेच त्यामुळे वाहन चालकांना मोठा धोका निर्माण झाले असून या कामाचा दर्जा काय ते कसे केले जाते यावर कोणाचे नियंत्रण आहे की नाही जुनी कामे शंभर वर्षे टिकली नवी कामे शंभर दिवस टिकत नाहीत त्यामुळे नागोठणे इंदापूर दरम्यान होत असलेल्या महामार्गाच्या कामांची पाहणी ही वरिष्ठ अधिकारी वर्गाने करावी अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते प्रवीण शिंदे व तुकाराम सानप यांनी केली आहे.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.