लॉकडाऊन रोजनिशी ई बुकचे ऑनलाईन प्रकाशन संपन्न
सिटी बेल लाइव्ह / पनवेल :-
अशक्याला शक्य करण्याचे कार्य लेखकांच्या हातून घडो असे अध्यक्ष सुनील सामंत यांनी लॉकडाऊन रोजनिशी ई बुकचे ऑनलाईन प्रकाशन व्यक्त केले.
गुरुपौर्णिमा निमित्ताने लॉकडाऊन रोजनिशी ई बुकचे ई साहित्य प्रतिष्ठानचे अध्यक्ष सुनील सामंत यांच्या हस्ते ऑनलाईन प्रकाशन करण्यात आले. साहित्य सेवक समुहाचे संयोजक नासा येवतीकर यांनी लॉकडाऊनच्या काळात सर्व साहित्यिक मित्रांना एकत्र करत दिनांक 19 मार्च ते 07 जून असे सलग पन्नास दिवस पन्नास विषय रोज एक लेख उपक्रम राबविले. ज्यात रोज एका नव्या विषयावर लेखन करण्यात आले. त्यात सहभागी झालेल्या एकूण 58 लेखकांचे प्रातिनिधिक स्वरुपातील लॉकडाऊन रोजनिशी ई बुक तयार करण्यात आले. गुरुपौर्णिमा निमित्ताने या ई बुकचा ऑनलाईन प्रकाशन सोहळा संपन्न झाला.
याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून विनोदी साहित्यिक नागेश सु. शेवाळकर, जेष्ठ साहित्यिक अरविंद कुलकर्णी, स्तंभलेखक श्री मिलिंद गड्डमवार, मुख्याध्यापिका सौ. सुभद्रा खेडकर, कवयित्री तथा लेखिका श्रीमती माणिक नागावे, उपक्रमशील शिक्षिका श्रीमती प्रमिलाताई सेनकुडे, पक्षीमित्र तथा शिक्षक सुंदरसिंग साबळे, ज्ञानमंथन ई मासिकाचे संपादक गणेश सोळुंके यांची उपस्थिती होती.
प्रमुख पाहुणे विनोदी साहित्यिक नागेश सु शेवाळकर यांनी म्हणाले की, महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यात असलेल्या लेखकांना एकत्र आणून, त्यांना लिहिते करून ई बुक प्रकाशित केल्याबद्दल शुभेच्छा दिल्या आणि लिहित रहा असा संदेश देखील त्यांनी दिले. पक्षीमित्र सुंदरसिंग साबळे यांनी अतिशय बोलके, जवळील विषय देऊन बुद्धीला चालना दिली. आपणही काही लेखन करू शकतो याचा आत्मविश्वास या उपक्रमामुळे वृद्धिंगत झाला असे आपल्या मनोगतात व्यक्त केले. गुरुपौर्णिमे निमित्ताने वाचकांना अनोखी भेट दिली असे ज्ञानमंथन ई मासिकाचे संपादक गणेश साळुंके यांनी आपल्या भावना व्यक्त केले तर मुख्याध्यापिका सुभद्रा खेडकर यांनी संकटसमयी लॉकडाऊनचा काळही सत्कारणी लावुन सर्वांना वाचनाचा, लेखनाचा आनंद मिळवुन दिला. तसेच अनेकांना लिखाणासाठी प्रवृत्त केले असे आपल्या मनोगतातून व्यक्त केले.
राजेंद्र शेळके यांनी सहवास आणि सहवासातील मित्र यामुळे जीवनाचा सुगंध अधिक दरवळत असतो. समुहाच्या रूपाने लेखनरुपी सुगंध सदैव असाच दरवळत राहो अशी सदिच्छा व्यक्त केली. मनीषा पांढरे यांनी उपक्रमामुळे आम्हाला नकळतपणे लिखाणाची आवड निर्माण झाली. दिसामाजी काहीतरी लिहीत जावे हे समजून त्यानिमित्ताने ग्रुपच्या माध्यमातून अनेकांचे लेख वाचायला मिळाले. लेखन-वाचन समृध्द झाले अशी प्रतिक्रिया व्यक्त केल्या.
तर अध्यक्षीय भाषणातून ई साहित्य प्रतिष्ठानचे अध्यक्ष व प्रकाशक सुनील सामंत म्हणाले की, लेखकांनी मोठे संकल्प सोडावेत. कादंबरी, महाकादंबरी, एखाद्या मोठ्या इतिहासखंडाच्या किंवा व्यक्तिमत्वाच्या अभ्यासाचा आणि नंतर लेखनाचा संकल्प करावा, जे आपल्याला झेपणार नाही असे वाटते तेच करायला घ्यावे. होऊ दे काय होईल ते असा विचार करून अशक्याला शक्य करण्याचे आपल्या हातून घडवे अश्या शुभेच्छा दिल्या.
या ऑनलाईन सोहळ्यास साहित्यिक राजेंद्र शेळके, मनिषा पांढरे, यशोधरा सोनेवाने, महेंद्र सोनेवाने, शिरीष देशमुख, धनंजय गुडसुरकर, प्रतिक उकले, श्वेता अंबाडकर, सौ. शुभांगी पवार, सौ. यशोधरा सोनेवने, हणमंत पडवळ, जीवनसिंग खसावत, जी एस पाटील, सौ. भारती दिनेश तिडके, सौ. सुनीता आवंडकर, निवेदिका रत्ना हिले, सौ.भारती सावंत, सौ. मेघा अनिल पाटील, सौ. अर्चना गरुड, डॉ. वर्षा सगदेव, मीना खोंड, अंकुश शिंगाडे, ज्ञानेश्वर झगरे, गौरी सिरसाट, स्नेहलता कुलथे, अमित बडगे यांची ऑनलाईन उपस्थिती होती.
कार्यक्रमाचे सुंदर सूत्रसंचालन साहित्य सेवक समुहाचे संयोजक नासा येवतीकर यांनी केले.






Be First to Comment