सिटी बेल लाइव्ह / उरण (घन:श्याम कडू)
आज उरणमध्ये १८ जण पॉझिटीव्ह सापडले तर १३ जण उपचार करून घरी सुखरूपणे परतले आहेत. उरण परिसरात पॉझिटीव्हचा आकडा कमी होताना दिसत नाही. त्यामुळे उरणच्या जनतेने सावध रहाणे आवश्यक आहे.
मोरा१, लक्ष्मी अपार्टमेंट उरण १, कामठा उरण१, ओमसाई अपार्टमेंट उरण १, हरिपांडवपंथ उरण १, बालई १, नागाव १, जासई २, धाकटीजुई १, दिघोडे १, करळ १, सावरखार १, सोनारी १, घारापुरी १, खोपटे २, चिरनेर १ असे एकूण १८ पॉजेटीव्ह सापडले आहेत. तर करळ १, सोनारी १, चिरनेर १, जांभुलपाडा १, द्रोणागिरी बोकडविरा १, म्हातवली १, उरण कोटनाका १, आवरे १, बोकडविरा १, नवापाडा विंधणे १, करंजा रोड उरण १, जसखार १ असे एकूण १३ जण बरे होऊन घरी परतले आहेत.
एकूण पॉझिटीव्ह ६२७, बरे झालेले ४४७, उपचार घेणारे १६३ तर मयत १७ असल्याची माहिती तहसीलदार भाऊसाहेब अंधारे यांनी दिली.
उरण परिसरात कोरोना पॉझिटीव्हचे पेशंट कमी होण्याऐवजी त्यात वाढ होताना दिसत आहे. त्यामुळे उरणकरांना खबरदारीसाठी स्वतःच जागृत रहाण्याची वेळ आली आहे.






Be First to Comment