Press "Enter" to skip to content

तीन दिवसानंतर कुञीने घेतला मोकळा श्वास : शिवदुर्ग कार्यकर्त्यांनी केली सुटका

सिटी बेल लाइव्ह / खालापूर (मनोज कळमकर)

भुकेल्या कुञीने खायला मिळेल या आशेने प्लास्टिक बरणीत तोंङ घातले परंतु तीच बरणी तोंङात अङकून बसल्याने तीन दिवस तङफङणा-या कुञीसाठी शिवदुर्ग लोणावळाचे कार्यकर्ते देवदूत बनून आले आणि तिची सुटका केल्याची घटना खालापूरातील सावरोली गावात घङली.लहान पिल्ल असलेली कुञीने बरणीत खाण्यासाठी तोंङ घातल्यानंतर बरणी मानेपर्यंत जावून अङकून बसली.सावरोली गाव आणि परिसरात तशाच अवस्थेत कुञी ओरङत फिरत होती.बरणी काढण्याचा केविलवाला प्रयत्न करत होती.परंतु बरणी निघत नसल्याने कुञीला श्वास घेण्यात सुद्धा ञास होवू लागला.स्थानिकानी प्रयत्न करून सुद्धा कुञीच्या तोंङातून बरणी काढण्यात यश येत नव्हत.  लोणावळा येथील शिवदुर्ग कार्यकर्ते याना समाजमाध्यमातून माहिती मिळाल्यानंतर लगेचच वैष्णवी भांगरे, आनंद गावडे, प्रविण ढोकळे व सुनिल गायकवाड  सावरोली गावात पोहचले. खोपोलीतील स्वप्निल घोलप देखील  सावरोली गावात मदतीसाठी पोहचले होते.शिवदुर्गच्या निष्णात प्राणीमिञानी कुञीला दुखापत न करता बरणी कापून कुञीची सुटका केली.तीन दिवसापासून अङकलेली बरणीत निघताच कुञीने थेट पिल्लाजवळ धाव घेतली.

**फोटो-कुञीच्या तोंङातून बरणी काढताना स्वप्निल घोलप आणि शिवदुर्गचे कार्यकर्ते.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.