Press "Enter" to skip to content

रोहा तालुक्यातील भात लावणीची कामे पूर्ण

सिटी बेल लाइव्ह / गोवे-कोलाड (विश्वास निकम )


रोहा तालुक्यात शेतीला पोषक असणारा पाऊस पडत असुन या पावसामुळे भाताचा राब वेळेत तयार झाल्याने व पावसाची संतधार सुरुच राहिल्यामुळे लावणीला सुरुवात झाली व पंधरा ते विस दिवसात रोहा तालुक्यातील भात लावणीची कामे पूर्ण झाल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे.
कोरोना विषाणू प्रादुर्भावाने सर्वत्र हाहाकार माजला असुन यात निसर्ग चक्रीवादळाचा फटका यामुळे प्रत्येक नागरिक हवालदीर झाला असला तरी न खचता कोकणातील शेतकरी आपला शेती हा मुख्य व्यवसाय करण्यासाठी सज्ज झाला.रोहिणी नक्षत्रा नंतर पावसाने दडी मारल्या नंतर शेतकरी वर्ग चिंताग्रस्त झालेला होता.परंतु दुबार पेरणी करण्यासाठी भाग पडणार असे वाटत असतांना पावसाला पुन्हा दमदार सुरवात झाली व भात शेतीच्या लावणीला सुरुवात करण्यात आली.
कोरोनामुळे सर्वत्र लॉक डाऊन करण्यात आला.यामुळे सर्वांची कामधंदे ही बंद झाले.यामुळे शेतीसाठी लागणारे खते व बी बियाणे यासाठी शेतकरी वर्गाला कसरत करावी लागली परंतु हार मानेल तो कोकणातील शेतकरी कसला? यामध्ये लॉकडाऊनमुळे सर्वांचे कामधंदे बंद असल्यामुळे मुंबई पुणे येथून गावाला आलेले चाकरमनी यांच्यामुळे मजुरीचा प्रश्न सुटला व यात भर म्हणुन पावसाची संतत धार यामुळे सर्वांनी आपली शेती घरीच लावण्यास सुरवात केली असुन विस ते पंचीविस दिवसाच या भात लावणीची कामे पूर्ण झाली असल्याचे शेतकरी वर्गातुन सांगण्यात आले आहे.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.