कोलाड हद्दीत चार वर्षाच्या मुलीवर बलात्कार करण्याचा प्रयत्न
दोन आरोपीं विरोधात पोलिस ठाण्यात पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल !
सिटी बेल लाइव्ह / कोलाड ( कल्पेश पवार )
रोहे तालुक्यातील कोलाड वरसगाव हद्दीत एका अल्पवयीन मुलीला बाहेर फिरण्याच्या बहाण्याने घरातून घेऊन जाऊन तिच्यावर बलात्कार करण्याचे प्रयत्न करणाऱ्या दोन आरोपीं विरोधात कोलाड पोलिसात पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या बाबत कोलाड पोलिस स्टेशन मधून दिलेल्या अधिक माहिती नुसार, फिर्यादी हिची सावत्र मुलगी वय ०४ हिला फिरवण्याच्या बहाण्याने पद्मावती नगर वरसगाव डोंगरावर जंगल भागामध्ये घेऊन जाऊन तिचे आत्येभाऊ आरोपी २ रा.पद्मावती नगर वरसगाव व आरोपी ०१ रा.आंबेवाडी या दोघानी संगमत करून लहान मुलीवर बळजबरी अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला.
या अल्पवयीन पिडीत मुलीच्या व फिर्यादी आई हिच्या तक्रारी नंतर कोलाड पोलिसात दोन आरोपी विरोधात 00४७/ २०२० भा.द.वी.कलम ३७६,३७६(२ ) (१) ३७६ (३)db ३४ बाल लै.अत्याचार सवक्षण पोस्को अधिनियम २०१२ ४, ६,८ ,प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.या बाबत पुढील तपास पी एस आय तायडे करीत आहेत .






Be First to Comment