Press "Enter" to skip to content

महिला कोविड सेंटरवरील सुरक्षा वाढवून आरोपीला कठोर शिक्षा द्या-निर्मला म्हात्रे 

सिटी बेल लाइव्ह / कळंबोली / प्रतिनिधी #

कोरोनाच्या महामारीत कोरोना सेंटरमध्ये महाराष्ट्राला लाजवेल अशी कोरोनाच्या उपचारासाठी असलेल्या महिलेवर बलात्काराची घटना घडली आहे. कोरोना महामारीच्या काळात अगोदरच लोकांमध्ये संभ्रम आणि भीती आहे आणि अशातच लाजिरवाण्या घटनेने तर कोरोना सेंटरच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह निर्माण होवून जनतेमध्ये प्रचंड रोष आणि अविश्वास निर्माण होत आहे.पनवेल मधील ही घटना संतापजनक आणि निंदनीय असून यामुळे पनवेल तालुका हा बदनाम होत आहे तेव्हा असा घटनाना पायबंद घालायचे असेल तर विलगिकरण सेंटर मधील महिलांच्या सुरक्षीतते बाबतीत गाभिर्यता घेण्यात येवून पोलिस बंदोबस्तात वाढ करण्यात यावी अशी  मागणी पनवेल शहर जिल्हा महिला काँग्रेस अध्यक्षा व माजी नगरसेविका निर्माळा म्हात्रे यांनी पनवेल तालुका वरिष्ठ पोलिस निरीक्षक यांच्याकडे  केली आहे. 

पनवेलमध्ये कोरोना बाबत बिकट परिस्थिती आहे. कोन येथील इंडियाबुल्स मध्ये पनवेल महानगरपालिका कॉरन्टाईन सेंटर सुरु केले आहे. याठिकाणी एक हजार रुम ताब्यात घेण्यात आलेल्या आहेत.  कोरोना संशयित रुग्णांना येथे कॉरन्टाईन करून ठेवण्यात येते. आता कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांवरही इंडियाबुल्स याठिकाणी उपचार केले जातात. शहराच्या बाहेर असलेल्या या कॉरन्टाईन व कोविड केअर सेंटरमध्ये गुरुवारी रात्री खारघर परिसरातील एका चाळीस वर्षीय महिलेवर 25 वर्षीय संशयित कोरोना संशयित रुग्णाने अतिप्रसंग केला. या घटनेमुळे कोरोना संशयित तसेच पॉझिटिव्ह महिला रुग्णांच्या सुरक्षितेचा प्रश्न निर्माण झाला आहे. या घटनेबद्दल तीव्र प्रतिक्रिया उमटल्या आहेत. 

तेव्हा  कोरोना संशयित व पॉझिटिव्ह महिलांसाठी सुरक्षा व्यवस्था वाढविण्यात येवून या प्रकरणातील आरोपीला कठोर शिक्षा करण्यात येवून जबाबदार अधिका-यावरही कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी  पनवेल शहर जिल्हा कॉंग्रेस अध्यक्षा आणि मा. नगरसेविका निर्मला म्हात्रे यांनी पनवेल तालुका  वरिष्ठ पोलिस निरिक्षण व पनवेल महानगरपालिका आयुक्त यांच्याकडे केली आहे. 

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.