सिटी बेल लाइव्ह / खांब-रोहे,(नंदकुमार मरवडे)
गटारीनिमित्ताने चिकन व मटण खरेदी करण्यासाठी खवय्यांनी आज खांब व कोलाड नाक्यावर मोठी गर्दी केली असल्याचे पहावयास मिळाले.
कोरोना व्हाईरसमुळे सध्या ठिकठिकाणी भितीदायक वातावरण पसरले आहे.त्यातच वाढणारा प्रादुर्भाव कमी होण्याचे नाव घेत नसल्याने रायगड जिल्हा प्रशासनाने अखेर १६ ते २६ जुलै पर्यंत लाँकडाऊन पुकारला आहे.लाँकडाऊन सुरू होण्यापूर्वी
खरेदीसाठी नागरिकांनी बाजारात फार मोठी गर्दी केली होती.तर कालच सायं.जिल्हा प्रशासनाने अत्यावश्यक सेवांबरोबरच किराणा दुकान,भाजीवाले,चिकन व मटण विक्रीसाठी निर्धारित वेळेत परवांनगी दिल्याने सा-यांना मोठाच आनंद झाला.तर लाँकडाऊन असल्याने चिकन व मटणाअभावी आपली गटारी साजरी होईल की नाही या धाकधुकीत असणाऱ्या खवय्यांना मात्र शासनाच्या या निर्णयामुळे मोठाच अत्यानंद झाला .कारण लाँकडाऊन सुरू होण्याच्या दोन दिवस अगोदरच तळीरामांनी आपापल्या घरी विविध देशी विदेशी मद्याचा साठा करून ठेवला होता.खरेदी केलेले असेच प्यायला लागते की असे वाटत असतानाच तर आज चिकन व मटण खावयास मिळाल्याने चिकण मटण व मद्याच्या पेगाबरोबर तळीरामांनी केली.तर सामान्यांनी देखील चिकन मटणावर ताव मारून आपली
मोठ्या आनंदात आपली गटारी साजरी केली.
मराठी कँलेंडर वर्षातील पवित्र श्रावण महिन्यास परवा मंगळवारपासून प्रारंभ होत असून श्रावण महिना हा विविध सण समारंभ व व्रतवैकल्ये यांचा महिना असल्याने या महिन्यात संपूर्ण महिनाभर मांसाहार वर्ज्य केले जात असल्याने उपवास धरण्याची परंपरा पूर्वीपासून चालत आली आहे.त्यामुळे संपूर्ण महिनाभर मांसाहार वर्ज्य करून विविध व्रतवैकल्ये व उपवास तपास करण्यापूर्वी पाहिजे तेवढे चिकण व मटण खाऊन नागरिकांनी मोठ्या उत्साहात गटारी साजरी केली असल्याचे पहावयास मिळाले.






Be First to Comment