Press "Enter" to skip to content

रोह्यात कोरोना महामारीचा आलेख चढताच : तालुक्याचे कोरोनाचे टेन्शन वाढले

◆ आज नव्याने २७ रूग्ण आढळले,तर दोघांचा मृत्यू

सिटी बेल लाइव्ह / कोलाड (कल्पेश पवार)

रोहे तालुक्यात कोरोना महामारीचा प्रादुर्भाव वाढत चालला असल्याने दिवसेदिवस कोरोना रूग्णांचा आलेख हा चढताच राहिला आहे.तर आज नव्याने २७ रुग्ण पाॅझीटिव्ह सापडल्याने व त्यामध्ये दोन म्रुत्यूची नोंद झाल्याने शहरासह ग्रामीण भागातील जनतेमध्ये घबराटीचे वातावरण पसरले आहे.
आज तालुका प्रशासनाकडून प्राप्त माहितीनुसार रोहे तालुक्यात आज नव्याने २७ रूग्ण सापडल्याने तालुक्याची एकूण रूग्णसंख्या ३३७ वर पोहोचली आहे.तर रोहे नागोठणे व कोलाड शहरी भागासह ग्रामीण भागात देखील रूग्ण सापडल्याने सर्वत्र भितीदायक परिस्थिती निर्माण झाली आहे.सध्या ६० रूग्णांवर उपचार सुरू असून २६९ रूग्ण बरे होऊन त्यांना डिस्चार्ज दिला आहे.
तालुक्यातील कोरोना रूग्णांचे बरे होण्याचे प्रमाणही त्यातल्या त्यात बरे असल्याचे दिसून येत असले तरी नागरिकांनी पुरेशी काळजी घेण्याची गरज असल्याचे बोलले जात आहे.तर कोरोना महामारीचा ताप वाढत चालला असून सर्वत्र भितीदायक वातावरण पसरले आहे. तर प्रादुर्भाव रोखण्यासाठी रोहे शहर पुढील काही दिवसांसाठी लाॅकडाऊन करण्यात आले आहे.कोरोनाचा आजार रोखण्यासाठी प्रत्येकाने खबरदारी घेऊन आपले व आपल्या परिवाराचे संरक्षण कसे होईल यासाठी प्रयत्न केले पाहिजेत.तर मी सुरक्षित तर माझा परिवार सुरक्षित, परिवार सुरक्षित तर समाज सुरक्षित, समाज सुरक्षित तर देश सुरक्षित ही भावना प्रत्येकाने मनाशी बाळगणे गरजेचे आहे.अशाप्रकारे प्रशासनाकडून प्रबोधन करण्यात येत आहे.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.