गुगल कडुन सिटी बेल वेबसाइट च्या यशावर शिक्कामोर्तब
अल्पावधीत करोडो वाचकांचे मन जिंकणाऱ्या वृत्त समूहावर होत आहे स्तुती सुमानांचा वर्षाव !
सिटी बेल लाइव्ह । गुगल सोर्स ।
वाचकांचे प्रेम आणि अपडेटेड बातम्यांचे सर्वंकष वृत्तांकन यामुळे गुगल सर्च मध्ये सिटी बेल वृत्त समूहाने पहिल्या तिघात स्थान पटकावले आहे. कोट्यावधी व्ह्युवर आणि रीडर असणाऱ्या सिटी बेल च्या या यशाचे श्रेय आमच्यावर प्रेम करणाऱ्या करोडो वाचकांचेच सिटी बेल ची घोडदौड अशीच अबाधित राहील याबद्दल दुमत नाही.समस्त वाचकांचे मनःपूर्वक आभार !
डिजिटल माध्यमातून बातम्यांचे अपडेट ठेवणाऱ्या वाचकांची संख्या झपाट्याने वाढत आहे. कोरोना मुळे लादलेल्या लॉक डाऊन मुळे वृत्तपत्रांची छपाई 70 टक्क्यांनी कमी झाली होती.अर्थातच त्यामुळे डिजिटल स्वरूपात बातम्या वाचणे नागरिकांच्या अंगवळणी पडले. मागच्या वर्षीच्या फेब्रुवारी महिन्यात सिटी बेल चे समूह संपादक विवेक पाटील आणि मंदार दोंदे यांनी सिटी बेल चे न्युज पोर्टल वाचकांच्या सेवेत रुजू केले.न्युज पोर्टल आणि डिजिटल मिडिया क्षेत्रातील मास्टर माईंड समजले जाणारे वैभव सोनटक्के यांनी सिटी बेल चे तांत्रिक संचालक म्हणून सिटी बेल च्या पायापासून ते कळसापर्यंत सुस्वरुपाची जबाबदारी यशस्वी पणे हाताळली.त्यांच्या प्रचंड अनुभवातून सिटी बेल डिजिटल मिडिया या क्षेत्रातील मैलाचे दगड ओलांडत घोडदौड करत आहे.
सर्च इंजिन ऑप्टीमायझेशन च्या युगात वास्तविक पाहता सर्च करताना पहिल्या तीघात येताना अत्युच्च दर्जा राखणे क्रमप्राप्त असते.सिटी बेल ने हा दर्जा कायम राखत चोखंदळ वाचक वर्गाला सर्वंकष बातम्यांचे माहितिजाल पुरवले आहे.अल्पावधीतच वाचकांच्या मनात घर करण्यात सिटी बिल वृत्त समूहाला यश आल्याचे या गुगल सर्च रिपोर्ट वरून सिद्ध होते. मंदार दोंदे आणि विवेक पाटील यांच्या पत्रकारितेत एक समान दुवा आहे.या दोघांनाही नाविन्याचा ध्यास असतो.दुसरे म्हणजे आलेल्या संकटामुळे खचून न जाता त्या संकटाला संधीत बदलण्याचे कसब या दोघांच्या अंगी आहे.ही द्वयी नेहेमी पुढच्या पाच वर्षांचा विचार करत पत्रकारिता करत असते असे या क्षेत्रातील दिग्गजांचे म्हणणे आहे.
सध्या गुगल जाहिरातींचे कंत्राट असलेले सिटी बेल हे रायगड जिल्ह्यातील एकमेव न्युज पोर्टल आहे. गुगल सर्च मध्ये टॉप थ्री पोझिशन मिळवल्याने सिटी बेल वृत्त समूहावर स्तुती सुमनांचा वर्षाव होत आहे.
जगभरातील १०० कोटी पेक्षा जास्त वाचकांनी सिटी बेल नाव सर्च केल्यानंतर तिसऱ्या क्रमांकावर सिटी बेल वृत्त समूहाचे नाव प्रकट होते. यासाठी सिटी बेल वृत्त समूहाच्या वाचकांची संख्या ध्यानात घेतली गेली होती. तसेच सिटी बेल वृत्त समूहाच्या वतीने गेल्या 188 दिवसांमध्ये टाकलेल्या बातम्यांचे सर्वंकष बाबतीत मूल्यांकन होऊन त्यांना गुण देण्यात आले होते. करोडो वाचकांच्या पसंतीस पडलेल्या या वृत्त समूहाच्या बातम्यांना त्यांच्या गुण आणि मूल्यांकन आधारे टॉप थ्री मध्ये स्थान देण्यात आले आहे. याकरता आमचे कर्मचारीवृंद, प्रतिनिधी, वार्ताहर यांचे मनःपूर्वक अभिनंदन.

Be First to Comment