सिटी बेल लाइव्ह / रसायनी–राकेश खराडे
सध्या स्थितीत संपुर्ण राज्यात विशेषतः मुंबई ,नवी मुंबई ,पनवेल भागात कोरोना संक्रमण वाढतच आहे.रसायनी परिसरात पाताळगंगा औद्योगिक क्षेत्र तसेच बी.पी.सी.एल इस्रो ,हिलइंडिया,एम.आय.डी.सी.,एम .एस.ई.बी.सेबी जय प्रेजीजन आदी कंपनीचे कामे चालु आहेत.मोहोपाडा येथे मोठी बाजारपेठ असल्याने येथे नागरिकांची रेलचेल मोठ्या संख्येने आहे.येथील जय प्रेसिजन कंपनी कामगार तसेच रसायनी लगत असलेल्या कंपनीतील कामगारांना मोहोपाडा येथील डाॕक्टरांना सुद्धा लागण सूरु झाली आहे.बी.पी.सी.एल कंपनीचे उत्पादन सूरू झाले नसले तरी इतर कामगारांना रेड झोन मुंबई ,नवी मुंबई ,ठाणे येथून कर्मचारी अधिकारी कामासाठी येत असतात.त्यामुळे संपर्कात येऊन कोरोना संक्रमण वाढतच आहे.त्याकरिता बी.पी.सी.एल कंपनीत अनावश्यक सुरु असलेली कामे जय प्रेसिजन मध्ये सूरू असलेली कामे व इतर अनावश्यक कामे बंद ठेवण्याकरीता तसेच मोहोपाडा बाजारपेठ मेडिकल दवाखाने दुध वितरण व्यतिरिक्त ७ दिवसांकरीता कर्प्यु करण्यात यावा व ३१ जुलै २०२० पर्यत रसायनी परिसर दांड ते आपटा परिसरात कडक निर्बंध लावण्यात यावे कि जेणे करून मनुष्य जिवितहानी धोका निर्माण होणार नाही या मागणीसाठी रसायनी प्रकल्पग्रस्त शेतकरी विकास सामाजिक संस्था मोहोपाडा,रसायनी यांनी जिल्हाधिकारी यांना निवेदना व्दारे मागणी केली आहे.
Be First to Comment