Press "Enter" to skip to content

कोरोना बाधीत महिलेवर बलात्कार करणा-या नराधमाचे आरोप पत्र घेवू नये

पनवेल बार असोसिएशनकडे प्रभाकर कांबळे यांची मागणी

सिटी बेल लाइव्ह / कळंबोली / प्रतिनिधी

 इंडिया बुल्स संकुलनातील कोरोना क्वारंटाईन सेंटर मध्ये महाराष्ट्राला लाजवेल अशी कोरोनाच्या उपचारासाठी असलेल्या महिलेवर बलात्काराची घटना घडली आहे. कोरोना महामारीच्या काळात अगोदरच लोकांमध्ये भीती आहे निंदनिय व कलंकीत करणा-या  घटनेने जनतेमध्ये प्रचंड रोष निर्माण झाला आहे.पनवेल मधील ही घटना संतापजनक आणि निंदनीय असून दुष्ट प्रवृत्तींना जास्तीत जास्त शिक्षा होणे समाज हिताच्या दृष्टीने अत्यंत गरजेचे आहे.

 तेव्हा या आरोपीचे वकील पत्र कोणाही घेवू अशी विनंती शेकापचे पनवेल महानगरपालिका जिल्हा सरचिटणीस प्रभाकर कांबळे यांनी पनवेल बार असोसिएशनचे अध्यक्ष अँड मनोज भुजबळ व कार्याकारीणीला निवेदनाने केली आहे. 

पनवेलमध्ये कोरोनाने थैमान घातले असून  बिकट परिस्थिती आहे. कोन येथील इंडियाबुल्स मध्ये पनवेल महानगरपालिका कॉरन्टाईन सेंटर सुरु केले आहे. याठिकाणी  कोरोना संशयित रुग्णांना  कॉरन्टाईन करून ठेवण्यात येते. आता कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांवरही इंडियाबुल्स याठिकाणी उपचार केले जातात. शहराच्या बाहेर असलेल्या या कॉरन्टाईन व कोविड केअर सेंटरमध्ये गुरुवारी रात्री खारघर परिसरातील एका चाळीस वर्षीय महिलेवर 25 वर्षीय संशयित कोरोना संशयित रुग्णाने अतिप्रसंग केला. या घटनेमुळे कोरोना संशयित तसेच पॉझिटिव्ह महिला रुग्णांच्या सुरक्षितेचा प्रश्न निर्माण झाला आहे. या घटनेबद्दल सर्व समाजातून तीव्र प्रतिक्रिया उमटल्या आहेत. सदर आरोपीविरूद्ध नागरिकांच्या मनात मोठी चीड निर्माण झालेली आहे. शेतकरी कामगार पक्षाचे पनवेल सहचिटणीस श्री. प्रभाकर कांबळे यांनी लेखी पत्राद्वारे आणि इतर काही सामाजिक संस्थांच्या पदाधिकाऱ्यांनी व मान्यवरांनी फोन करून व भेटून तोंडी स्वरूपात सदर आरोपीचे वकीलपत्र न घेण्याची विनंती आपल्या संघटनेच्या सभासदांना केली आहे.

वकिल म्हणून आपली सामाजिक जबाबदारी मोठी आहे. कोविड सेन्टर मध्ये उपचार घेणाऱ्या एका महिलेवर अत्याचार करणाऱ्या या नराधमाचे वकिलपत्र कोणीही घेणे योग्य होणार नाही, असे पनवेल बार असो.च्या कार्यकारिणीस वाटते.कार्यकारिणी कोणासही त्याचे वकीलपत्र घेण्यापासून रोखू शकत नाही हे जरी खरे असले तरी, बऱ्याच महिला वकिल भगिनींनी सुद्धा हीच इच्छा आहे, तेव्हा सर्वांना विनंती करण्यात येते की, जनभावनेचा आदर करून पनवेल वकिल संघटनेच्या कोणत्याही सभासद वकिलाने सदर आरोपीचे वकीलपत्र स्वीकारू नये अशी विनंती शेकापचे पनवेल महानगरपालिका जिल्हा सरचिटणीस प्रभाकर कांबळे यांनी पनवेल बार असोसिएशनचे अध्यक्ष अँड मनोज भुजबळ व वकील संघटनाना केली आहे. 

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.